सार्वजनिक चौकात आणि स्मारक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावा,अभिलाषा रोकडे ग्राम पंचायत, पोलिस प्रशासनाला निवेदन

Install CCTV cameras at public squares and memorials, request to the Gram Panchayat, police administration to stop desire

आबा सूर्यवंशी

(जळगांव जिल्हा प्रतिनिधी )- नगरदेवळा दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे ठाणे अमलदार मोरे महाराज, दिनेश पाटील, सरपंच सौ. प्रतिक्षाताई काटकर , किरण काटकर यांना निवेदन देण्यात आले.नगरदेवळा सह परिसरात वाढत्या चोरी, अवैधता व इतर अनेक विघ्नसंतोषी कारवायांवर आळा आणि वचक बसवण्यासाठी ग्राम पंचायत आणि पोलीस प्रशासनाने तातडीने गावातील विविध चौक व सर्वच स्मारकानाजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसावावे .सद्यास्थितीत गाव परिसरातून कापूस, पाळीव प्राणी, शेतीजन्य माल साहित्य, मोटारसायकली, लहान मोठे दुचाकी वाहने व घरफोडीच्या भुरट्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ होत असून दररोज एक ना अनेक ठिकाणी चोऱ्या होत असल्याने सीसीटी व्हि कॅमेरा बसवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आमच्या पोलीस प्रशासनाचा ताणही कमी होईल . यासाठी अभिलाषा भिला रोकडे युवती अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी निवेदन दिले. यावेळी मुकेश राजपूत युवासेना जिल्हा उपाध्यक्ष , गणेश गुंजाळ , निलेश महाजन, गोरख महाले, प्रणव महाजन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button