इनर व्हील कराड संगम विविध पुरस्काराने सन्मानित

पनवेल येथे झालेल्या स्वर्णप्रभा या डिस्ट्रिक्ट असेम्ब्ली मध्ये वर्षभर केलेल्या क्लब च्या कामगिरी बद्दल इनर व्हील क्लब कराड संगम ला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपाणी यांच्या हस्ते हा बक्षीस समारंभ संपन्न झाला. इनर व्हील चे हे 100 वे वर्ष असून कराड संगम चे 10 वे वर्ष आहे .गेली 10 वर्ष क्लब ने विविध क्षेत्रात आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
यावेळी रचना मालपणी यांनी प्रेसिडेंट तरुणा मोहिरे व सर्व क्लबचे कौतुक केले. क्लब सेक्रेटरी छाया पवार यांना ‘बेस्ट सेक्रेटरी’ ट्रेजरेर सारिका शहा याना ‘बेस्ट ट्रेजरर,’ आय एस ओ अंजना माने याना ‘बेस्ट आय एस ओ’ ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच डिस्ट्रिक्ट 313 च्याअंतर्गत असलेल्या 77 क्लब मधून इनर व्हील क्लब कराड संगम ला इनर व्हील ब्रँडिंग व इमेज बील्डिंग ,हॅपी स्कूल आणि वन मेंबर वन प्रोजेक्ट या बद्दल ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.क्लब ने केलेल्या कार्याचे डिस्ट्रिक्ट चेअरमन रचना मालपाणी व सेक्रेटरी आशा देशपांडे ,डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉशोभना पालेकर यांनी या वर्षी क्लब ने राबविलेल्या उपक्रमाचे खूप कौतुक केले.क्लब ने या वर्षी 126 प्रोजेक्ट केले.त्या मध्ये 1000 अंगणवाडी सेविकांचे मोफत कॅन्सर तपासणी,100 मुले दत्तक घेऊन त्यांच्या सर्वगीन विकास साठी विविध उपक्रम ,गरजू मुलींना वाटप, बस स्टॉप उभारणी इ उपक्रम केले.यावेळी क्लब प्रेसिडेंट अपूर्वा पाटणकर,सेक्रेटरी सारिका शहा ,आय असं ओ सारिका वेल्हाळ ,एडिटर निमिशा गोर या कार्यक्रमाला उपस्तीत होत्या.सर्व क्लब मेम्बरच्या सहकार्याने हे यश मिळाले असे प्रे तरुणा मोहिरे आणि से छाया पवार यांनी सांगितले.

 

कराडहून पियुष गोर यांची रिपोर्ट

Related Articles

Back to top button