आइडियल पत्रकार संघटना पनवेल तालुका अध्यक्ष पदी बळीराम पाटील यांची नियुक्ती
पनवेल/ नवी मुंबई –
आइडियल पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र रायगढ़ जिल्ह्यात विस्तार करण्यासाठी पनवेल चे धडाडीचे पत्रकार बळीराम हिरामण पाटील यांची
आइडियल पत्रकार संघटना पनवेल तालुका अध्यक्ष पदी तर विकास गोपीनाथ दवणे यांची पनवेल तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आइडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय कुमार मिश्रा यांच्या आदेशानुसार प्रमुख राष्ट्रीय महासचिव सूर्यकांत कदम यांनी ही घोषणा केली आहे.
प्रमुख राष्ट्रीय महासचिव सूर्यकांत कदम यांनी सांगितले की सदर नियुक्ती आइडियल पत्रकार संघटनेचे केंद्रीय संपर्क प्रमुख आबासाहेब सूर्यवंशी, राष्ट्रीय सचिव राशिद खान पठान, राष्ट्रीय महासचिव नितिन शिंदे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आरिफ खान पठान तथा रायगड जिल्हा अध्यक्ष श्रीमती जमुना रूपसिंह चव्हाण यांचेशी विचारविनिमय करून नियुक्त्या केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सह इतर भागात आइडियल पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.