Akola news:जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अशोक अमानकर यांच्या बद्दल जिल्हय़ातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सूर ….

रिपोर्ट:महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

अकोट येशील आदर्श लाॅन वर जिल्हा काँग्रेस च्या जिल्हय़ातील सातही तालुक्यातील ठळक नेत्यांची बैठक संपन्न.. बैठकीला जिल्हय़ातील माजी अध्यक्ष हिदायत पटेल बाबाराव विखेपाटील, सुनिल धाबेकर, मा.आमदार खतीब साहेब मा.आमदार, बबनरावजी चौधरी बबन डाबेराव ,रामसिंग जाधव, सुभाषचंद्र कोरपे संजय बोडखे, हेमंत देशमुख,व सातही तालूका अध्यक्ष व जिल्हय़ातील सर्व महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. अमानकर यांची नियुक्ती झाल्या पासूनच जिल्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त नाराज होते ज्या वक्तीचा काँग्रेस पक्षा सोबत तिळ मात्र संमध नव्हता ज्यांचे संपूर्ण आयुष्य सरकारी सेवेत गेले अश्या व्यक्तीवर सेवेतून निवृत्त झाल्या बरोबर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाचा भार सोपवण्यात आला त्याबद्दल नाराजी होतीच पण तरी सुध्दा जिल्यातील कार्यकर्त्यांकडून हा प्रदेश काँग्रेस चा निर्णय समजून निमूट पणे सहन केला.ज्या दिवसा पासून अमान कर यांनी सूत्र हातात घेतले त्या दिवसा पासूनच त्यांची वागणूक हेकेखोर पनाची होती सर्व स्तरातील कार्यकर्त्यांकडून एकच सूर ऐकायला मिळत होता ते कार्यकर्त्यांना आपले पटवारी व कामदारा सारखी वागणूक देतात ज्या गावात जाता त्या गावातील काँग्रेस च्या कार्यकर्त्यांना सोडून विरोधकांच्या घरी भेटी देण्याचा सपाटा सुरू केला सोबत कोनाला ही घेत नाही त्या गावातील कार्यकर्त्यांना पन विचारात घेत नाही. त्यांच्या या वागणुकीवर सर्व जिल्हय़ातील महत्वाच्या कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सूर ऐकू येत होता हे होत असतांना जिल्हय़ातील मा. आमदारांना व मा. अध्यक्षांना सूध्दा ते विचारता घेत नसून मनमानी कारभार सूरू होता . तालुका अध्यक्षांना सुध्दा सपत्नीक वागणूक देत होते त्यांच्या जाचाला कंटाळू आज त्याचा फार मोठा विस्फोट होउन जिल्हय़ातील सर्व कार्यकर्ते आज अकोट येथे एकत्र येऊन जिल्हा अध्यशांचा जिल्यातील नेत्यांन समोर चांगलाच समाचार घेतला येनाऱ्या दिवसात लोकसभा नगरपरिषद व महा नगरपालिका निवडणूका तोंडावर आल्या असतांना जिल्यात अश्या प्रकारे काँग्रेस चे वातावरण झाले आहे.. सभेला संपुर्ण जिल्यातील मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते ….!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button