पाचोरा सीसीआय कापुस खरेदी केंद्रात कापसाची आवक वाढली सभापती- गणेश पाटील

Cotton arrivals at Pachora CCI Cotton Procurement Center have increased. Chairman- Ganesh Patil

आबा सूर्यवंशी
( जळगाव जिल्हा प्रतिनीधी )- कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा- भडगाव सी.सी.आय मार्फत गजानन जिनिंग – प्रेसिंग फॅक्टरी येथे कापूस खरेदी सुरु केले आहे. सदर खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक वाढत आहे. शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीसाठी आपली ऑनलाईन नांव नोंदणी सी.सी.आय खरेदी केंद्र पाचोरा येथे प्रथम करावी. नांव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी चालू पिक पेरा असलेला कापुस ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँकच्या पास बुकची पहिल्या पानाची स्पष्ट झेरॉक्स प्रत या कागदपत्रां सह स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. एक एकरला १२ क्विंटल कापसाची नोंद होईल, नाव नोंदणी झाल्यानंतर कापुस टप्या- टप्याने आणावा. कारण खरेदी केंद्रावर दररोज ६० ते ६५ वाहनांचे मोजमाप होत आहे. त्या अनुषंगाने आपली वाहने सी.सी. आय केंद्रावर संपर्क करून कापुस विक्रीसाठी आणावीत व गिरड रोड कडील रस्त्यावरच वाहने लावावीत जेणेकरून वेळ व खर्च वाचेल. तसेच दर शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टी असल्याने व शासनाच्या सर्व सुट्यांच्या दिवशी खरेदी केंद्र बंद राहील असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश पाटील ,उपसभापती पि .ए.पाटील सह संचालक मंडळ व सचिव बी.बी. बोरुडे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button