गृहमंत्री अमित शहा वक्तव्याचा आणि परभणी घटनेचा पाचोऱ्यात निषेध

Protests in Pachora against Home Minister Amit Shah's statement and Parbhani incident

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधि ) –
पाचोरा – परभणी येथे संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या देशद्रोही इसमावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात सामील बौद्ध बांधवांवर पोलीसांनी लाठीचार्ज व अमानुष मारझोड केली या मारझोडीत सोमनाथ सुर्यवंशी यांना आपले प्राण गमवावे लागले. शहीद झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूची न्यायालयीन चौकशी तसेच आंदोलन कर्त्यांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संबोधून केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी पाचोरा येथे दि. २१ डिसेंबर शनिवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता शहरातील रेल्वे स्थानक रस्त्यावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली .महात्मा जोतीराव फुले स्मारक, हुतात्मा स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाचोरा पोलीस स्टेशन पर्यंत निदर्शने करत सर्व पक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी किशोर डोंगरे, विकास पाटील , खंडू सोनवणे, अनिल लोंढे, अॅड. अविनाश भालेराव, खलील देशमुख, भालचंद्र ब्राम्हणे, हरिभाऊ पाटील,अशोक मोरे, भरत खंडेलवाल, शरद पाटील, नंदकुमार सोनार, योगेश कदम, सुरज अहिरे, वाजीद बागवान, उमेश निकम यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button