पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयात ४ जाने. रोजी राज्यस्तरीय इतिहास परिषद
State level history conference on 4th Jan at M.M. College, Pachora

पिटीसी शिक्षण संस्थेच्या वतीने उपस्थीत राहण्याचे आवाहन!
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधि)
पाचोरा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA), शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहकार्याने व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जाने. रोजी राज्यस्तरीय एक दिवशीय इतिहास परिषद आयोजित करण्यात आली आहे. सदर परिषद महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयोजनाखाली होणार आहे. परिषदेसाठी स्थानिक इतिहास पुनर्लेखन आणि संशोधन हा विषय निवडण्यात आला असून स्थानिक इतिहासाच्या संवर्धनासाठी संशोधन आणि अभ्यासाच्या नव्या वाटा शोधण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची आहे.
श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय, नॅकच्या तिसऱ्या चक्रात सी ग्रेड (CGPA 1.91) प्राप्त आहे. हा कार्यक्रम इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, समन्वयक प्रा. माणिक पी. पाटील हे कार्यभार सांभाळत आहेत.
*या परिषदेचे उद्दिष्ट* स्थानिक इतिहासाच्या विविध पैलूंचे सखोल पुनर्लेखन व त्यावरील संशोधनास चालना देणे, इतिहासाच्या अभ्यासकांना स्थानिक पातळीवर इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी स्रोत व पद्धती यावर मार्गदर्शन करणे, विद्वानांनी संशोधनातून स्थानिकांना इतिहासाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवून देणे, परिषदेत सहभागी होणाऱ्या इतिहास अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापक यांना स्थानिक इतिहासाच्या अद्ययावत माहितीसह नवीन संशोधन विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमादरम्यान विविध तज्ञ व्याख्यानांद्वारे आपले विचार मांडतील, तसेच इतिहास पुनर्लेखनाच्या महत्त्वाकडे लक्ष वेधतील.परिषदेला राज्यातील मान्यवर इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक इतिहास पुनर्लेखन परिषदेचा उद्घाटन समारंभ ४ जाने. रोजी सकाळी ९.०० ते १०.३० या वेळेत पार पडणार असून, प्रमुख उद्घाटक व वीजभाषक म्हणून डॉ. सोमनाथ रोडे, प्राचार्य व अध्यक्ष, अखिल भारतीय सर्वोदय संघ, लातूर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ. दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी, मानद सचिव अॅड. महेश देशमुख, दगाजी वाघ, भागचंद राका, दुष्यंत रावल, डॉ. पितांबर पाटील, सुरेश देवरे, डॉ. जयंत पाटील, संजय कुमावत, योगेश पाटील, सतीष चौंधरी, खलील देशमुख, प्रा. एस. झेड. तोतला उपस्थिति देणार आहे.
*द्वितीय सत्रः सकाळी १०.३० ते १२.००
द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ. जी. बी. शहा, अध्यक्ष, जैन इतिहास परिषद, महाराष्ट्र राज्य, आणि प्राचार्य डॉ. वसंत श्रावण देसले, के.एन.एम.पी.पी. कला महाविद्यालय, मारवड, हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहे. या सत्रात इतिहास संशोधनाच्या विविध पद्धती, स्थानिक इतिहासाचे महत्त्व, आणि स्थानिक वारसाच्या जतनाच्या उपक्रमांवर चर्चा होईल. *शोधनिबंध वाचन* दुपारी १२.०० ते १.०० या वेळेत सहभागी संशोधक व अभ्यासक आपले शोधनिबंध सादर करतील. या सत्रात इतिहासाच्या विविध पैलूंवर आधारलेले अभ्यासपूर्ण विचार मांडले जातील. त्यानंतर दुपारी १.०० ते २.०० दरम्यान भोजनाची व्यवस्था आहे.
*तृतीय सत्र* दुपारी २.०० ते ३.३०
तृतीय सत्रात डॉ. प्रशांत सुधाकरराव देशमुख, चेअरमन, इतिहास अभ्यासमंडळ, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव, आणि प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, माजी अधिष्ठाता, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव हे प्रमुख वक्ते असतील. या सत्रात इतिहास पुनर्लेखनासाठी आवश्यक साधने, ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन आणि संशोधन प्रक्रियेतील आव्हाने यावर चर्चा होईल.
*चौथे सत्र व समारोप*
दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत समारोप सत्र पार पडेल. यामध्ये प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील, सदस्य, इतिहास अभ्यासमंडळ, क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ, जळगाव हे प्रमुख वक्ते असतील, तर अध्यक्षपदाची जबाबदा व्ही. टी. जोशी, व्हा. चेअरमन हे सांभाळतील. या सत्रात प्रा. एस. झेड. तोतला यांचीही प्रमुख उपस्थिती राहील
या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक इतिहासाच्या महत्त्वपूर्ण पैलूंवर नव्याने प्रकाश टाकला जाईल. परिषदेच्या यशस्वीतेसाठी इतिहास अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. डॉ.जे.डी. गोपाळ समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ.माणिक पी.पाटील सहसमन्वयक यांनी केले आहे.


