विज्ञान प्रदर्शन मध्ये पिंपळगाव हरेश्वर उर्दू शाळा प्रथम
Pimpalgaon Hareshwar Urdu School first in science demonstration

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी )
नांद्रा तालुका पाचोरा येथे नुकतेच झालेले नवभारत साक्षरता कार्यक्रम व विज्ञान प्रदर्शन मध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळा पिंपळगाव हरेश्वर यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या प्रदर्शनी मध्ये पहिली ते पाचवी गट, इयत्ता सहावी ते आठवी गट, इयत्ता नववी ते बारावी असे गट होते. सहावी ते आठवी ह्या गट मध्ये सुमारे 70 प्रोजेक्ट व मॉडेल होते. यामध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळा पिंपळगाव हरेश्वर यांनी भूकंपग्रस्त घर बनवून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. शुक्रवार रोजी मौलाना आजाद हॉल,जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे झालेले एका शैक्षणिक कार्यक्रम मध्ये गोराडखेडा उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख शेख कदिर शब्बीर यांनी भूकंपग्रस्त मॉडल ला प्रथम क्रमांक वर पोहोचवणारे व परिश्रम घेणारे जिल्हा परिषद उर्दू शाळा पिंपळगाव हरेश्वर चे सर्व शिक्षकांचे कौतुक व त्यांचे सत्कार केले. तसेच जारगाव उर्दू, व उर्दू कन्या शाळा पाचोरा यांनी सुद्धा चांगला प्रदर्शन दिल्याने त्यांचेही सत्कार करण्यात आले.यावेळी मोमीन अब्दुल मालिक,अन्सारीअशफाक,अबु उबेदा जलालुद्दीन,तौकीर कमरोद्दीन,समरीन बेगम, खालिल शेख, रिजवान सर,अंजुम कुरेशी,अब्दुल एजाज, शेख जावेद रहीम यांनी परिश्रम घेतला. एका वेळी शिक्षकांची कमतरतेतून वृत्तपत्राची सुरखी बनणारी पिंपळगाव उर्दू शाळा आता चांगले शिक्षक लाभल्याने त्यांचे कर्तृत्ववान कार्यातून प्रसिद्ध होत आहे, असे प्रतिपादन केंद्रप्रमुखांनी केले.केंद्र केंद्रप्रमुख यांनी शिक्षकांना नवीन संकल्प दिली की आपल्याला मिळून गोराडखेडा उर्दू केंद्राला आदर्श केंद्र बनायचं आहे व त्यासाठी आपल्याला भरपूर प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्व शिक्षकांनी सहभागी होऊन चांगल्या पद्धतीने आपला योगदान दिल्यास हि संकल्पना लवकरात लवकर पुर्ण होऊ शकतो. यावेळी मंच वर मुख्याध्यापक रईस सुभान खान व अश्फाक शेख उपस्थित होते. सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले.आभार अल्ताफ कुरेशी यांनी मांडले.


