लायन्स क्लब कराड सिटी तर्फे दर्पण कार बाळकृष्ण जांभेकर त्यांच्या स्मरणार्थ पत्रकार दिवस कोटा अकॅडमी येथे साजरा करण्यात आला
Lions Club Karad City celebrated Journalist Day at Kota Academy in memory of Darpan Kar Balkrishna Jambhekar.
कराड विद्या मोरे .
या वेळी लायन्स क्लब कराड सिटी च्या वतीने कराड येथील विविध वृत्तपत्रातील तसेच न्यूज चॅनल च्या सुमारे 30 पत्रकारांचा सन्मान करण्यात आला . लायन डॉ महेश खुस्पे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित पत्रकारांचे स्वागत केले . लायन्स क्लब कराड सिटी च्या अध्यक्षा लायन मंजिरी खुस्पे यांनी दर्पणकार बाळकृष्ण जांभेकर यांच्या विषयी माहिती सांगून पत्रकार दिनाची माहिती उदघोषित केली . या वेळी सर्व उपस्थित पत्रकारांना लायन्स क्लब कराड सिटी तर्फे भेटवस्तू प्रदान करण्यात आली . यावेळी सकाळ , लोकमत , पुढारी , ऐक्य , मुक्तागिरी , यशवंत नगरी , वाय झेड इंडिया , आयबीएन , टीव्ही 9 , भारत 24 , एबीपी , झी न्युज इत्यादी वृत्तपत्रे व वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते . पत्रकार प्रमोद तोडकर , विशाल पाटील व देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करून लायन्स क्लब कराड चे आभार मानले . या वेळी माजी अध्यक्ष लायन संदीप कोलते यांनी सर्वांचे आभार मानले . लायन्स क्लब कराड सिटी चे सदस्य ला . स्मिता कदम , ला . अनिल पाटील , ला. कांचन सोळवंडे , ला राजकुमार बाबर , ला. अंजली चव्हाण , ला . मीनाक्षी कोलते, कॅबिनेट ऑफिसर विद्या मोरे उपस्थित होते . सर्व उपस्थित पत्रकार व लायन सदस्यांना चहा व नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता झाली .