कासोदा सोनबर्डी येथे १९ किलो गांजा जप्त,मोटारसायकल सह २ लाख,८०,००० रु. किमंतीचा मुद्देमाल जप्त

आबा सूर्यवंशी
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी) कासोदा ता.एरंडोल – पोलीस स्टेशन हद्दीत व परीसरात गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती माहीती मिळाल्याने पोस्टे. हद्दीत वेशांतर करुन मागील ५ दिवसां पासुन सपोनि. निलेश राजपुत व त्यांच्या पथकाने गांजा पकडण्या साठी सापळा रचला होता. सुरवातीचे ४ दिवसांपासून अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु दि.२५/०२/२०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोठे गावाजवळ सपोनि. निलेश राजपुत पोउनि. दत्तु खुळे,पोहेकॉ. नंदलाल परदेशी, पो कॉ.समाधान तोंडे, पोकॉ. लहु हटकर यांना एरंडोल कडुन कासोदा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोठे गावाजवळ एक संशयित इसम त्याचे मोटार सायकलवर प्लास्टीकचे गोणीत गांजा घेवुन जात असल्याची माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचुन त्याची मोटारसायकल पाठलाग करुन थांबवली.त्याचे मोटार सायकल वरील गोणीची तपासणी केली असता त्यात खाकी रंगाचे टेपने पॅक केलेले चौकोनी आकाराचे पुडे मिळून आले. ते फोडुन पहिले असता त्यामध्ये गांजा मिळुन आला. संशयित आरोपी अजय रविंद्र पवार वय २७ रा.सोनबर्डी ता. एरंडोल याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन १९ किलो गांजा व मोटारसायकल असा एकुण २,८०,००० रुपये किमंती चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोहेकॉ. नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादी नुसार गांजाची वाहतुक करणाऱ्या इसमाविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे (एनडीपीएस) अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस मा. न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार व मा. अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनात सपोनि.निलेश राजपुत पोउनि.दत्तु खुळे,पोहेकॉ. नंदलाल परदेशी, पोना.अकील मुजावर, पोना किरण गाडीलोहार, पोना. नरेद्रगजरे, पोकॉ.समाधान तोंडे, पो.कॉ.लहु हटकर अशांनी कारवाई केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि.निलेश राजपुत करीत आहेत.


