केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी केली पोलिसांची कानउघडणी, मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांवर कार्यवाहीचे आदेश!

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
मुक्ताईनगर, कोथळी येथील यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढल्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता.! या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला असून मंत्री श्रीमती खडसे यांनी कठोर कार्यवाहीचे आदेश दिले आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मंत्री रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाने तेथील पोलीस स्टेशन ठाण्यात मुलींची छेड काढणाऱ्या चार तरुणां विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे मुलींच्या सुरक्षे बाबत मंत्री रक्षा खडसे संतप्त झाल्या आणि त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठून पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संत मुक्ताई यात्रेत मोठ्या प्रमाणात महिला,पुरुष, तरुणी व सर्व वयोगटातील भक्तगण व नागरिक सहभागी होतात. या दरम्यान यात्रेच्या निमित्ताने महिलांवर अशा प्रकारच्या अनुचित घटना घडणे हे अत्यंत चिंताजनक असल्याची नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. या प्रकारानंतर मंत्री रक्षा खडसे यांनी यात्रेत बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी तत्काळ कठोर पावले उचलावी, महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना तत्काळ अटक झाली पाहिजेअसे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना रक्षा खडसे म्हणाल्या कि, कोथळी येथे दरवर्षा प्रमाणे यात्रा भरते माझी मुलगी हि शुक्रवारी यात्रेत गेली असता तिची काही टवाळखोर तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार घडला असून मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथील तक्रार देण्यासाठी आपण काही मुलींसोबत सोबत आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सागितले.

Related Articles

Back to top button