युवा सेनेतर्फे (शिवसेना शिंदे गट) वाल्मिक कराड यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन
-वाल्मिक कराड ला फासावर लटकवा, पोलिस निरीक्षक यांना दिले निवेदन.
आबा सूर्यवंशी
( जळगांव जिल्हा प्रतिनिधी) – मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे क्रुर हत्या करण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड यांच्या विरोधात पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेतर्फे जोरदार घोषणाबाजी करत वाल्मिक कराड यांचा प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत पुतळा फुंकण्यात आला. वाल्मिक कराड यास फासावर लटका अशा घोषणा युवा सेनेतर्फे देण्यात आल्या. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, तालुका प्रमुख टिल्लु अप्पा पाटील, शहरप्रमुख भोला पाटील, सुरज शिंदे, सुमित पाटील, गणेश चौधरी, अतुल चौधरी यांचेसह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वाल्मिक कराड यास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा आशयाचे निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आले.