कायद्याचा योग्य वापर केल्यास निश्चित फायदा!,ॲड. रवि पाटील,पाचोरा येथे नविन कायद्या संदर्भात मार्गदर्शन!

 

आबा सूर्यवंशी

(जळगांव जिल्हा प्रतिनिधी) –
पाचोरा – दि.५ मार्च बुधवार रोजी शहराच्या भडगांव रोडवरील व्यापारी भवनात पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे नवीन फौजदारी कायदे विषयी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम डीवायएसपी धनंजय येरुळे यांच्या अध्यक्षतेत तर मुंबई- पनवेल येथील सरकारी वकील रवी पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडला. भारतात १ जुलै २०२४ पासून नवीन कायदे लागू करण्यात आले आहेत. या विषयी जनसामान्य व्यक्ती, पोलीस विभाग व शासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नवीन कायद्याची माहिती व्हावी तसेच कायद्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे, संविधानात कायदा हा सर्वांसाठी समान असून नविन कायद्यात समाजातील कोणत्याही घटकामध्ये भेदभाव करण्यात आलेला नाही. कायद्याचा योग्य वापर केला तर त्याचा निश्चित चांगला फायदा होतो असे मार्गदर्शन सरकारी वकील श्री. पाटील यांनी उपस्थितांना केले . पाचोरा विभागाचे डी.वाय. एस.पी. धनंजय येरुळे यांनी देखील नविन कायद्या संदर्भात मनोगत व्यक्त केले.यावेळी पोलिस निरीक्षक अशोक पवार, पिंपळगाव पोस्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक शितल परदेशी यांच्यासह पोलिस कर्मचारी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक, विविध शासकीय विभागात काम करणारे कर्मचारी आदिंची उपस्थिति होती.

Related Articles

Back to top button