टाइगर किड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – टाइगर किड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रारंभी प्रमुख अतिथी सौ.डाॅ. अनुजा देशमुख, यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले. यावेळी सौ. जयश्री मराठे, सौ. ललिता पाटील प्रमुख उपस्थितीत होत्या. यानंतर सौ.डाॅ अनुजा देशमुख, सौ.ललिता पाटील तसेच शाळेच्या अध्यक्षा सौ.प्रियंका रोहन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचे चेअरमन रोहन पाटील उपस्थित होते. माॅम आणि मी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकांनी आपल्या मुलांसोबत कार्यक्रमात नृत्याविष्कार सादर केले.शाळेच्या अध्यक्षा सौ.प्रियंका पाटील यांनी आपल्या मनोगतातून आजचा दिवस संपूर्ण जगभरात महिलांच्या सन्मानासाठी, त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देण्यासाठी आणि समानतेच्या दिशेने टाकलेल्या पावलांचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित आहे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेणे गरजेचे आहे. असे सांगून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी माॅम आणि मी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सोनाली पाटील यांनी केले, तर सौ. कविता सोनवणे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.