मतीमंद युवकावर ६७ वर्षीय वृद्धाकडून अनैसर्गिक अत्याचार

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी) –
पाचोरा तालुक्यातील एका गावात ३० वर्षाच्या मतिमंद युवकावर वृद्धाने शेतात अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार २१ मार्च रोजी सायंकाळी घडला. ६७ वर्षांचा संशयीत आरोपी या घटनेनंतर फरार होता. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार पाचोरा तालुक्यात एका गावातील बस स्थानकाजवळ एक ३० वर्षीय मतिमंद मुलगा वावरत होता. गावातीलच एका वृद्धाने मतिमंद तरुणाला गोड बोलुन गावाजवळील शेतात नेले आणि तेथे त्याच्यावर अतिप्रसंग केला. ही घटना शेतात मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी गेलेल्या काही युवकांनी पाहिली. त्यांनी त्या वृद्धाला पकडले मात्र तो घटनास्थळावरुन पसार झाला. ही घटना समोर आल्यानंतर पीडित मतिमंद युवकाच्या वडिलांनी पाचोरा पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलासोबत झालेल्या अतिप्रसंग कथन केला. यावेळी प्रत्यक्षदर्शी घटना पाहिलेले युवकही पोलिस ठाण्यात हजर झाले होते. पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी पोलिसांचे पथक तयार करुन संशयीत आरोपीच्या मागावर पाठविले. पो.काॅ. संदीप राजपूत व पोलीस वाहन चालक समीर पाटील यांनी सापळा रचून ६७ वर्षीय संशयीत आरोपीस अटक केली आहे. या अनैसर्गिक कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button