पोलिस निरीक्षकाच्या आशीर्वादाने सोयगाव तालुक्यात अवैधधंद्याचा सुळसुळाट,पोलिस अधीक्षकांना नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे निवेदन!
Police Inspector's blessing to solve illegal business in Soygaon Taluk, request to Police Superintendent, corporators and officials!
आबा सूर्यवंशी
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भाग व शहरात अवैधधंद्यानी विळखा घातला आहे. शहरातील अवैधधंदे तातडीने बंद करावे यासाठी सोयगाव नगर पंचायतच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी दि.२८ रोजी पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन सोयगाव पोलिस निरीक्षकांच्या आशीर्वादाने अवैधधंद्याचा सुळसुळाट झाल्याची केली असून हे धंदे त्वरित बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे.
सोयगाव शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या अवैधधंद्या मुळे कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे .सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती सोयगाव पोलिसांना असूनही पोलीस जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील वातावरण बिघडले आहे .या प्रकारांना पोलिस निरीक्षक पंकज बारवाल हे जबाबदार आहे. अवैधधंद्यानी तालुका बदनाम होत आहे. तर प्रचंड प्रमाणात विक्री होत असलेल्या अवैध दारू धंद्यांना महिला वैतागल्या असून घरांमध्ये कौटुंबिक वाद होत आहे. नुकतेच घोरकुंड गावात संतप्त महिलांनी दारूबंद करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत अवैध दारू विक्रेत्यांनी लपवून ठेवलेली दारुच्या बाटल्या एका विद्यार्थीनीने काढून दिल्या तरीही अद्याप या गावात एकही कारवाई झाली नाही. यावरून पोलिसांची निष्क्रियता दिसून येते असा आरोप पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. निवेदनावर नगरपंचायत गटनेते अक्षय काळे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर आबा काळे,
नगराध्यक्ष आशाबी तडवी, उपनगराध्यक्ष सुरेखा काळे, शेख शाहीस्ताबी रऊफ, हर्षल काळे,संध्या मापारी
कुसुम दुतोंडे, संतोष बोडखे, भगवान जोहरे, गजानन कुडके, वर्षा घनघाव, ममताबाई इंगळे, आशीयाना शहा, अशोक खेडकर, लतीफ शहा आदी नगरसेवक, कंकराळा येथील कुणाल राजपुत (युवासेना ता.म)
फिरोज उसमान खा पठाण (सरपंच गलवाडा) आदींच्या सह्या आहे.