जारगाव चिंचखेडा सोसायटी पदाधिकाऱ्यांचा सत्कार, आ.किशोर आप्पा पाटील यांनी केले मार्गदर्शन
Felicitation of Jargaon Chinchkheda Society officials, A.Kishore Appa Patil under guidance

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पाचोरा येथे जारगांव – चिंचखेडा विविध विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन व व्हा चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माननीय आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांनी नवनियुक्त चेअरमन पदी धनराज पाटील व व्हा चेअरमन पदी विलास पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याबद्दल संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विविध विकास सोसायटी संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील आबा पाटील ,संचालक शिवाजी पाटील, संचालक सचिन पाटील , संचालक काशिनाथ पाटील, संचालक परेश पाटील उपस्थित होते.


