आ.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते ई लायब्ररी उदघाटन, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या विद्यार्थी हिताच्या उपक्रमाचे आ. किशोर पाटील यांचे कडून कौतुक

E-library inaugurated by A.Kishor Appa Patil, A.Kishor Patil appreciates Chief Minister Mangesh Deore's initiative for the welfare of students

आबा सूर्यवंशी
(महाराष्ट्र प्रतिनिधी) पाचोरा नगरपरिषद संचलित म.गांधी सार्वजनीक वाचनालय वास्तूमध्ये स्थलांतरीत केले आहे. शहरातील विद्यार्थ्यांना एक मोलाची भेट नगरपालिकेने दिलेली असून दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते आधूनिक ई-लायब्ररीचे उदघाटन – लोकार्पण करण्यात आले. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी विद्यार्थ्यांना ई-लायब्ररी अंतर्गत देशातील अग्रगण्य स्पर्धा परिक्षा करीता तयारी करुन घेणाऱ्या नामांकित संस्थांच्या वक्त्यांची लेक्चर उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक करतांना आमदार म्हणाले की, मुख्याधिकारी हे नेहमीच नाविन्यपुर्ण उपक्रम राबवित असून त्यांनी ई-लायब्ररी सारखा उपक्रम नगरपालिकेच्या वाचनालयात आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठया शहरात न जाता गावात राहून नामांकित स्पर्धा परिक्षा केंद्रांची अभ्यासाची भाषणे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिल्याने त्यांची गैरसोय टळून गरीब विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष संजय गोहील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, तहसिलदार विजय बनसोडे, नयन तहसिलदार कुमावत, रणजीत पाटील, श्री. मोरे, स्विय सहाय्यक राजेश पाटील, पत्रकार सुनिल पाटील, प्रविण ब्राम्हणे, उप मुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, नगर अभियंता भैय्यासाहेब पाटील, कार्य.अधिक्षक चैतन्य राऊत, संगणक अभियंता मंगेश माने, विद्युत अभियंता योगेश रेवेकर, प्रसाद पटारे, शशिकांत भालेराव, आरोग्य निरीक्षक तुषार नकवाल, पा.पु.अभियंता श्रुतीका धात्रक आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहा.ग्रंथपाल शाम ढवळे, गजानन पाटील ययांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन ललित सोनार तर आभार सहा.ग्रंथपाल शाम ढवळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button