सुनील पाटील शेतकरीसेना जिल्हाध्यक्ष ; प्रविण ब्राह्मणे शिवशक्ती भीमशक्ती:जिल्हाध्यक्ष पदी निवड
Sunil Patil Shetkari Sena District President; Pravin Brahmine Shivshakti Bhimshakti: Elected as District President

आबा सूर्यवंशी
महाराष्ट्र प्रतिनिधी: शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षातील पाचोरा व भडगांव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनान्याय देण्याचे पत्रकार म्हणून काम करणारे सुनिल रंगराव पाटील यांची शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष, शेतकरीपुत्र हेमंत ज्ञानदेव चव्हाण यांची शेतकरी सेनेच्या उपजिल्हाध्यक्ष, तर पत्रकारी तेतून समाजसेवेचा वसा घेतलेले अभ्यासू पत्रकार प्रविण हरिषचंद्र ब्राम्हणे यांची भीमशक्ती- शिवशक्ती जिल्हाध्यक्षपदी, माहेजी येथील नरेश पंडितराव पाटील यांची एस.टी. कामगारसेना जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे. निवड झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वतीने भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.


