पाचोरा नगरपरिषद, रोटरी क्लब संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन सिंदूर रक्तदान अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद
Pachora Municipal Council, Rotary Club jointly organize "Operation Sindoor Blood Donation Campaign"
(आबा सूर्यवंशी/ महाराष्ट्र प्रतिनिधी)-
पाचोरा नगरपरिषद, व रोटरी क्लब , पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन सिंदूर रक्तदान अभियान” दिनांक १४ मे बुधवार रोजी सकाळी ८ ते १२ वाजेदरम्यान हुतात्मा स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा येथे आयोजीत करण्यात आलेले होते. सदरच्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळालेला असून यात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी, दुर्गेश सोनवणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. गोरख महाजन, चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, प्रदिप पाटील, निलेश कोटेचा, डॉ.मुकेश तेली, डॉ.अजयसींग परदेशी, डॉ.अमोल जाधव, शिवाजी शिंदे, डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी , सदस्य उपस्थित होते. रेड प्लस सोसायटी, जळगांव या रक्तपेढी तर्फे डॉ.रविंद्र पाटील, डॉ.अमोल पाटील, डॉ.दिपक पाटील, परिचारीका कु.वैष्णवी यांचे सहकार्य लाभले.