नगरदेवळा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti celebrated at Nagardevala
(आबा सूर्यवंशी/महाराष्ट्र प्रतिनिधी)-
तालुक्यातील नगरदेवळा येथे स्वराज्यरक्षक, महापराक्रमी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.
ट्रॅकर वर संभाजी महाराजांचा पुतळा ठेवून झेंडे,पताके, फुलांची सजावट करून विद्युत रोषणाईत , ढोल ताशांच्या गजरात, वाजत गाजत मिरवणूक शनीमंदिर जवळून खालच्या गावातून, भडगाव दरवाजा, गणपती दरवाजा, वाणी गल्ली, पोलीस स्टेशन, वरचे गाव या मार्गे मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील सामाजिक, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस अधिकारी , कर्मचारी, शिवशंभू प्रेमी मोठ्या संख्येने सामील झाले होते. मिरवणुकीचे आयोजन शंभूराजे उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते.