जेष्ठ नागरिक माऊली बहुद्देशीय संस्थेची मासिक बैठक संपन्न* विरंगुळा केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव!

Monthly meeting of Senior Citizen Mauli Multipurpose Organization concluded* Lack of basic facilities at recreation center!

पाचोरा प्रतिनिधी ( आबा सूर्यवंशी)

पाचोरा येथील माऊली बहुद्देशीय जेष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने विरंगुळा केंद्रात संस्थेचे अध्यक्ष राजाराम सोनार यांच्या अध्यक्षतेत मासिक विचार विनिमय साठी आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक युवराज महाजन, संतोष पाटील, कैलास महाजन, छगन पाटील, नाना महाजन, चंद्रकांत शेलार, विजय सागर शांताराम चौधरी, लक्ष्मण आबा सूर्यवंशी, देविदास महाजन आदी सह महिला ,पुरुष, सदस्य उपस्थित होते.

जेष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि सुविधांचा अभाव

ज्येष्ठांच्या वाढत्या वयानुसार येणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि आरोग्याच्या समस्या बाबत आणि विरंगुळा केंद्रात शासन, प्रशासन तसेच सामाजिक स्तरावर दानशूर व्यक्ती यांच्या मार्फत जेष्ठ नागरिकांना आवश्यक सोई सुविधा मिळविण्या बाबत देखील विचार विनिमय करण्यात आले. विरंगुळा केंद्रात जेष्ठ नागरिकांच्या सभासद संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जेष्ठ नागरिकांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून पाचोरा नगर परिषदेने ओपन स्पेस देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असून नगर परिषदेने उन्हा पासून बचाव करण्यासाठी शेडची रुंदी वाढविणे, विजेची आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा, पंखे, प्रसाधन गृह आदी समस्या मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या विविध समस्या, उपाय, उपचार बाबत नेत्रतज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी मार्गदर्शन केले. आणि ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्याची ग्वाही दिली. तसेच या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी विजय सागर यांनी लाऊडस्पिकर सेट उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी .एन.चौधरी तर आभार सचिव नाना महाजन मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button