पाचोरा उर्दू शाळेत प्रवेश उत्सव व नवीन शैक्षणिक वर्षाची उत्स्फूर्त सुरुवात
Entrance ceremony and spontaneous start of the new academic year at Pachora Urdu School
पाचोरा (आबा सूर्यवंशी ) जिल्हा परिषद उर्दू कन्या व मुलांची शाळापाचोरा येथे नवीन शैक्षणिक वर्षाची उत्स्फूर्त सुरुवात झाली असून प्रवेश उत्सव साजरा व नवागताचे स्वागत करण्यात आले. सकाळी प्रभात फेरी मार्फत शैक्षणिक जनजागृती करून पालकांना आव्हान पत्र देण्यात आले. नंतर मुलांची शाळेत कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पाचोरा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार के.डी.पाटील हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना केंद्र प्रमुख शेख कदिर यांनी मांडली.उद्दिष्ट शेख जावेद यांनी प्रस्तुत केले.कार्यक्रम मध्ये मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, समाजसेवक,शिक्षण प्रेमी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.समाधान पाटील यांनी पालकांना व उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करून जिल्हा परिषद शाळेत मिळणारी सोयी सुविधा जसे मोफत गणवेश,पाठ्यपुस्तक इतर सुविधा बाबत माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याचे आव्हान केले. जि. प. उर्दू कन्या शाळेत दरवर्षी वाढलेली विद्यार्थी पटसंख्या व चालू वर्षात विविध परीक्षांची तयारी, तालुक्यात उत्कृष्ट शिष्यवृत्ती परिणाम, बद्दल कन्या शाळेचे कौतुक केले. यावेळी नवागताचे मान्यवरांचे हस्ते फुल, मोफत पाठ्यपुस्तक,गणवेश देऊन स्वागत करण्यात आले. शालेय पोषण आहारात मिष्टान्न देण्यात आले. शाळेचे माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सईद शब्बीर यांच्या मार्फत गुलाब जामून वितरीत करण्यात आले.कार्यक्रम मध्ये केंद्रप्रमुख शेख कदिर, ग्रेडेड मुख्याध्यापक एजाज बागवान,अध्यक्ष इम्रान शेख, इरफान पिंजारी, मौलाना इकबाल,माजी नगरसेवक अय्यूब बागवान, लतिफ खान, सईद शब्बीर, निसार पिंजारी, सय्यद गफफार, सय्यद तारिक,बाबा पठाण,सादिक शेख,रिजवान बागवान,इरफान मणियार,शाकीर बागवान शिक्षक वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार शेख जावेद रहीम यांनी केले.