निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा, स्कूलच्या अध्यक्षा वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात!

International Yoga Day celebrated at Nirmal International School, the program was inaugurated by the school's president, Vaishalitai Suryavanshi!

पाचोरा प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी)
निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे दिनांक २१ जून शनिवार रोजी सकाळी ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सकाळच्या सत्रात शालेय प्रांगणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या अध्यक्षा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.या प्रसंगी प्रख्यात योगाचार्य नारायण मांडवडे यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिकांसह योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक लाभ, मनःशांती, ताणतणावमुक्त जीवनशैली, आयुर्वेदाचे महत्त्व, त्यातील आहार-विहाराचे नियम , विद्यार्थ्यांना नैसर्गिक आरोग्याकडे वळण्याचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी शाळेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील, तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग दिनाचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणी साठी शाळेतील क्रीडा शिक्षकांचे विशेष योगदान लाभले. विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी आत्मीयता, आरोग्याबद्दल जागरूकता व भारतीय परंपरेचा अभिमान निर्माण झाला असून योगदिनाच्या निमित्ताने शाळेतील वातावरणात आरोग्य, शांती, सकारात्मकतेचा अनुभव आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button