पाचोरा तालुक्यात आणीबाणीच्या विरोधात भाजपा तर्फे काळादिवस साजरा,पिंपळगाव मंडळातील २५ कार्यकर्त्याचा सन्मान!

पाचोरा प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी)

देशात काँग्रेसच्या राजवटीत तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित करून एक प्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची पायमल्ली करून लोकशाहीची हत्या केली. आणिबाणी घोषित केल्याच्या घटनेला पन्नास वर्ष झाली असून भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात हा काळादिवस पाळण्यात आला आहे . आपातकालीन काळात संविधान रक्षणासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढणाऱ्या अनेक लोकांना तुरुंगवास भोगावा लागला होता .

याच अनुषंगाने पाचोरा तालुका भारतीय जनता पार्टी पिंपळगाव हरेश्वर मंडळ तर्फे आणीबाणी घोषित दिवस विरोधात काळादिवस पाळण्यात आला आणि देशात लोकशाही धोक्यात आहे असा अपप्रचार आणि बनाव करणाऱ्या काँग्रेसचा निषेध करण्यात आला तसेच या कार्यक्रमात पिंपळगाव हरेश्वर मंडळातील संविधान रक्षणासाठी त्या वेळेच्या काँग्रेस राजवट सरकार विरोधात लढणाऱ्या २५ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, भाजपा पदाधिकारी तथा जिल्हा परिषद माजी सदस्य मधुकर काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
आणीबाणीच्या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून नरेंद्र पाटील शिंदाड यांनी माहिती दिली. या वेळी विजय कडू पाटील, तात्या पाटील, अशोक कृष्णराव पाटील, विनोद महाजन, श्री.जयतमल, नगरदेवळा मंडळ अध्यक्ष गोविंद शेलार, पिंपळगाव मंडळ अध्यक्ष शोभाताई तेली आदी पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जेरवाल यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button