अकोल्यात भीषण अपघात; कांदा वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकनं दुचाकी अन् ऑटोरिक्षाला उडवलं; एक महिला ठार तर 3 जण जखमी

अकोल्यात भीषण अपघात झाला आहे; भरधाव ट्रकने दुचाकी आणि ऑटोरिक्षाला उडवलं आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यु झालाय आहे, तर तिन जण जखमी झाले आहे. अपघातातील जखमींना तातडीनं अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरखेड रस्त्यावरील खंडाळा फाटयानजीक हा अपघात झाला आहे. दरम्यान हिवरखेड वरून अकोट कडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने या घटनेत दुचाकी वरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुचाकीस्वार असलेला व्यक्ति हा जखमी झाला आहे.

त्यानंतर एका ऑटो रिक्षावाला ट्रकने कट मारल्याने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर हा ट्रक पुढे जाऊन पलटी झालाय. कांदा वाहून नेणारा हा ट्रक असून ट्रक मधील शेतमालाचेही मोठं नुकसान झालं आहे. या अपघाताची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आहे, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान अद्याप पर्यंत मृतक महिला आणि जखमींचे नाव कळू शकले नाहीत.

प्रतिनिधी शोएब खान हिवरखेड अकोला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button