Akola:जेसीआय अकोट च्या महिला समूहाणे विविध उपक्रमातून साजरा केला महिला सशक्तीकरण सप्ताह

महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद

जेसीआय आकोटच्या महिला समूहाच्या वतीने महिलांच्या गरजा तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असणाऱ्या प्रकल्पांचे आयोजन करून तसेच त्यांना सबल करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधित महिला सशक्तिकरण सप्ताह साजरा करण्यात आला. महिला समूहाने सतत सात दिवस विविध कार्यक्रम राबवित जेसीआय अकोट महिला समूहाने वेगळा नाव लौकिक प्राप्त केला.
यामध्ये प्रथम दिवशी स्वरा व्यवहारे यांनी महिलांच्या जीवनामध्ये योगासन तसेच नृत्याचे अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांनी नियमित योगासने व प्राणायाम करणे हे गरजेचे आहे तसेच नृत्य हा पण एक व्यायाम आहे व आपण नृत्याच्या माध्यमातून सुद्धा आपला विकास करावा असा सल्ला देत योगा व नृत्याचे प्रशिक्षण दिले. दुसऱ्या दिवशी त्वचारोग तज्ञ डॉ .आरती अंबळकार यांनी त्वचा विकार , खबरदारी व उपाय या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले.. महिला हे संपूर्ण कुटुंबाला विकास पथावर नेण्याचं कार्य करत असते विशेष करून अभ्यास घेण्याची ही जबाबदारी तिच्यावरच जास्त असते त्यामुळे तिला हस्ताक्षर चे सुद्धा ज्ञान असावे या उदात्त हेतूने शिक्षणातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे हस्ताक्षर सुंदर असणे याबाबत मार्गदर्शन व कार्यशाळा हस्ताक्षरतज्ञ आदर्श शिक्षक नितीन शेगोकार यांच्या मार्गदर्शनात हस्ताक्षर सुधार कार्यशाळा तिसऱ्या दिवशी महिलांकरिता घेण्यात आली. त्यानंतर चौथ्या दिवशी स्वबळावर गृह उद्योग कसा काढावा याबद्दल महिलांना महालक्ष्मी गृह उद्योग येथे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. गृह उद्योग कसा करतात याची प्रेरणा त्यातून महिलांनी घेतली व संचालिका शीतल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
आज मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये कॅन्सर या रोगाचा प्रादुर्भाव होत असताना दिसत आहे तो कशामुळे होतो त्याची खबरदारी कशी घ्यावी याबाबत विशेष मार्गदर्शन डॉ.गुंजन वालसिंगे यांनी केले. सहाव्या व सातव्या दिवशी लघु उद्योग क्षेत्रातील यशस्वी महिलांचे अनुभव, मार्गदर्शन तसेच मुलाखत घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला
वरील सर्व विविध कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्वतःला कार्यक्षम कसे करावे याबद्दल मार्गदर्शन घेतले. जेसीआय अकोट महिला समूहाच्या प्रमुख वैशाली नितीन शेगोकार यांच्या नेतृत्वात हा सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये अध्याय प्रथम महिला रश्मी अडोकार ,सचिव शुभांगी पिंपळे, प्रकल्प प्रमुख सारिका व्यवहारे, सह प्रकल्प प्रमुख अंजली नवले ,स्मिता चावडा, वंदना झाडे, सुषमा झाडे, प्रज्ञा घाटोळ,ममता हाडोळे, स्वाती वासे, प्रिया घाटोळ, शीतल लहाने, प्रिया लहाने ,स्वरा व्यवहारे ,शारदा लहाने ,प्रीती बनसोड ,वर्षा लकडे, वैशाली देशपांडे, प्रिया गायगोले ,दिपाली कडू, अंजली नवले, आरती अंबळकार, माया इंगळे, किरण मावदे, यांच्यासह अनेक महिलांनी उस्फूर्त सहभाग घेतला, या सर्व कार्यक्रमाकरिता अध्याय अध्यक्ष अजय अडोकार ,सचिव डॉक्टर कृष्णन बजाज, सहसचिव भारत कोथळकर, पूर्वाध्यक्ष नंदकिशोर शेगोकार, प्रशांत खोडके ,नितीन शेगोकार यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button