बैतूल:जननी आई देवी पालखी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

बैतूल से शेख इकबाल की खास रिपोर्ट

दिनांक:-२९/०३/२०२४
नितीन शिंदे -पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील हावरे गावातील गावदेवी जननी आई देवी चा पालखी सोहळा प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मंगलमय व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास मुंबई, पुणे येथून अनेक चाकरमानी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात त्याच प्रमाणे हावरे गावातील माहेरवाशिणी देखील जननी आई देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने या सोहळ्यास वेगळीच रंगत निर्माण होते. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढत व लेझीम नृत्य करीत भक्त तल्लीन होऊन नाचतात. या सोहळ्यास हावरे गावातील माहेरवाशीण सौ. शिल्पा गणेश गायकवाड यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ लेझीम दिल्याने त्यांचे गावाच्या वतीने आभार मानण्यात आले. या सोहळ्यास संपूर्ण तालुक्यातील भक्त येत असल्याने दर वर्षी मोठी भाविकांची गर्दी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button