Akola:अकोट शहर पोलीसांनी हरवीलेली सोन्याची १५ ग्रॅमची पोत,मालकाच्या ताब्यात दिली
महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनेद
दिनांक २८/०३/२०२३ अर्जदार रामलाल आत्माराव इंगळे वय ५५ वर्ष रा. चित्तलवाडी ता. तेल्हारा जि. अकोला यांनी पोलीस स्टेशन अकोट शहर येथे अर्ज दिला की त्यांची अकोट येथील सराफा लाईन मधील अशोक मुंडगावर यांच्या दुकानापुढे रस्त्यावर सोन्याची १५ ग्रमची पोत गहाळ झाली आहे अशा अर्जावरून पो.स्टे.ला मौसीग नोंद घेण्यात आली होती. सदर मीसींग मधील पोत गुन्हे शोध पथक अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र शोध घेवुन आज दिनांक ०२/०४/२०२४ रोजी अशोक गणेशराव खंडारे वय ३५ वर्ष धंदा मजुरी रा. आसेगाव बाजार ता. अकोट जि. अकोला यांचे कडुन सदरची पोत प्राप्त करून अर्जदार रामलाल आत्माराव इंगळे यांना बोलावुन संबधीत पोत बाबत पडताळणी करून त्यांच्या ताब्यात सुस्थीतीत देण्यात आली.
वरील नमुद कार्यवाहीत मा. पोलीस निरीक्षक श्री तपन कोल्हे यांचे सह पो उपनि. अख्तर शेख, पो.हे.कॉ. चंद्रप्रकाश सोळंके, पोहेकॉ. राजेश वसे, पो. कॉ. विशाल हिवरे, पो.कॉ.रवी सदाशिव, पो.कॉ. मनीष कुलट, पो.कॉ. सागर मोरे हे हजर होते.