Akola news:शहर पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीची सभा.शांतता आहेच तशीच कायम ठेवण्याचे आवाहन.

रिपोर्ट:मोहम्मद जुनेद
अकोला जिले के अकोट शहर पोलिस स्टेशनच्या आवारात शांतता समितीच्या सभेचे आयोजन दि.१६ मे २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता करण्यात आले होते. या सभेला अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोकर, अकोट शहरचे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे तथा शांतता समितीचे सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
अकोला येथे सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याच्या कारणावरून दंगल उसळली होती. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आपल्या अकोट शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने शांतता समितीच्या सभेचे आयोजन शहर पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी सभेत बोलतांना सांगितले की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियाचा जपून वापर करा, कोणतीच वादग्रस्त पोस्ट फॉरवर्ड करू नका, शक्यतो काही दिवस ग्रुपची सेटिंग ओन्ली अडमिन करा, वादग्रस्त पोस्ट आढळल्यास पोलिसांशी संपर्क करा, सर्वांना त्रास होईल असे कुठलेही कृत्य करू नका, आपल्या अकोट शहरात सर्वांच्या सहकार्याने शांतता आहे आणि अशीच शांतता कायम ठेवा. काही निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवा. आम्ही शहरात शांतता राहावी यासाठी तत्पर आहोत आपले पण सहकार्य अपेक्षित आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची सीआर पीसी कलम १४४ प्रमाणे तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून आदेश प्राप्त झाल्यानंतर लवकरच ते कारवाई करण्यात येईल.
यानंतर पोलिस उपविभागीय अधिकारी रितू खोकर यांनी, शहर आपले सर्वांचे आहे आणि शहरात शांतता राहावी याची जबाबदारी सुद्धा आपली सर्वांची आहे.आपण सर्वांनी खूप सहकार्य केले आहे यापुढेही असेच सहकार्य अपेक्षित आहे. समाजातील काही लोकं चुकीचे काम करतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण शहर वासियांना भोगावा लागतो. सगळ्यात जास्त त्रास हा मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबांना होतो. त्यामुळे जागरूक राहा पोलिसांना सहकार्य करा असे आवाहन केले.
शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात..
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात राज्य राखीव बलाच्या आठ तुकड्यासह, गृहरक्षक दल, पोलीस अंमलदार असा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिवसाची व रात्रीची गस्त वाढवून फिक्स पॉइंट लावल्या गेले आहेत.
ग्रुप अडमिनची सभा.
शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील सोशल मीडिया ग्रुप अडमिन यांना सीआरपिसी कलम १४९ अंतर्गत नोटीस जारी करण्यात आल्या असून ग्रुपची सेटिंग ओन्ली अडमिनं करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले आहे तसेच शहर पोलिस स्टेशनला शहरातील ग्रुप अडमिंन यांची सभा सुद्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये सोशल मीडियाचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
या सभेला अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोकर, शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता अजय वसू, शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव,शहर पोलीस कर्मचारी, गोपनीय विभागाचे मोहन फरकाडे , राजनकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button