ROKO नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंटमध्ये टर्फ धुरंदर संघ विजयी! आयुष पटवारी मालिकावीर
Turf Dhurandar team wins ROKO Night Cricket Turf Tournament! Ayush Patwari is the player of the series
आबा सूर्यवंशी /महाराष्ट्र प्रतिनिधी -रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या निवृत्तीनंतर मानवंदना म्हणून एकदिवसीय ROKO नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंट पाचोरा क्रिकेट टर्फे येथे आयोजित करण्यात आली होती. यात टर्फ धुरंदर संघाने अंतिम सामन्यात नुरानी बॉईज संघाचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. टर्फ धुरंदर संघाला ११,००० रू .रोख व विजयी चषकाने सन्मानित करण्यात आले.
आयुष पटवारी या स्पर्धेचा मालिकावीर ठरला.
टर्फ धुरंदर संघाकडून किशोर निंभोरीकर, नयन सूर्यवंशी, प्रशांत देवरे, आयुष पटवारी, चेतन चित्ते, विशाल पाटील, शुभम कदम व विजय कटारिया यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.