ठाणे:एकलव्य दिव्यांग फाऊंडेशन दिव्यांगांचा आधार
भिवंडी/ठाणे : शहापूर मध्ये दिव्यांगांना एका छताखाली घेऊन आल्यानंतर त्यांचे विविध प्रश्न अर्ज, विनंती, निवेदने या द्वारे शासन दरबारी मांडल्यानंतर प्रसंगी आंदोलनाची धार तेज करणारी व दिव्यांगांना न्याय देणारी एकलव्य दिव्यांग फाउंडेशन ही दिव्यांग बांधवांनी स्थापन केलेली संस्था आज शहापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांची स्वतःची हक्काची अशी चळवळ उभी राहत आहे. आज भिवंडी येथे दिव्यांगांचे विविध प्रश्न, त्यांना येणाऱ्या विविध अडचणी, शासन व प्रशासनाची दिव्यांगंबद्दल असणारी उदासीनता, विविध योजना व त्या राबवितांना येणाऱ्या अडचणी या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी भिवंडी येथील दिव्यांग बांधवांनी दिव्यांग संवाद सभेचे आयोजन केले. या सभेसाठी शेकडो दिव्यांग बांधवानी हजेरी लावली. या दिव्यांग संवाद सभेसाठी एकलव्य दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नितीन पडवळ यांनी उपस्थित राहून दिव्यांगांना त्यांच्या हक्कांबद्दल प्रथमतः जाणीव करून दिली.
औद्योगिक दृष्ट्या संपन्न आणि ऐतिहासिक ओळख असलेला, आर्थिक सुबत्ता असणारा भिवंडी तालुका म्हणून जगभर ओळख असे असले तरी या ठिकाणी आजही दिव्यांग बांधव शासकीय योजना-सेवा सुविधांपासून उपेक्षित आहे. योग्य मार्गदर्शनाचा अभाव, समाजाचा-राजकीय दृष्टया दिव्यांगाप्रती असणारा संकुचित दृष्टीकोन यामध्ये खितपत पडलेला भिवंडी तालुक्यातील दिव्यांग बांधव विविध योजनांपासून आजही उपेक्षित आणि वंचित आहे. अश्यावेळी महाराष्ट्र भर कार्य करत असणारी एकलव्य दिव्यांग फाऊंडेशन आशेचा किरण म्हणून येथील दिव्यांग बांधव पाहत आहेत. आणि याच आशेने आज शेकडो दिव्यांग बांधवानी एकत्र येऊन दिव्यांग संवाद सभेचे आयोजन करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करतांना प्रा. नितीन पडवळ सर यांनी एकलव्य दिव्यांग फाऊंडेशन ही दिव्यांग बांधवांच्या न्याय व हक्कासाठी संकल्पीत अशी संस्था असून तुमच्या पाठी संस्था सदैव उभी असेल. जिथे जिथे अन्याय तिथं संस्था प्रबळपणे आपल्या पाठी असेल. लवकरच संस्थेच्या माध्यमातून भिवंडी येथे अधिकृत शाखा तयार करून संस्थेची कार्यकारणी जाहीर करून संपूर्ण भिवंडी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना एकत्र करून दिव्यांग महामेळावा आयोजित केला जाईल. भिवंडी शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग समस्या सोडविण्यासाठी संस्था नेहमीच पुढे येईल, या पुढे दिव्यांगांना स्वयं रोजगार उपलब्ध करून आर्थिक स्वावलंबन बनविण्यासाठी संस्था नेहमीच पुढे असेल. पुढील काळात भिवंडी तालुक्यातील दिव्यांग बांधव हा दुर्लक्षित राहणार नाही असे यावेळी सांगितले.
भिवंडी तालुक्यातील दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते श्री जगदीश पाटील यांनी या वेळी बोलताना सांगितले की, अश्या खूप साऱ्या संस्था संघटना आहेत मात्र दिव्यांगानी दिव्यांगांसाठी तयार केलेली व शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेऊन कार्य करणारी संस्था म्हणून आम्ही अनेक वर्षे एकलव्य दिव्यांग संस्थेचे काम पाहत आलेले आहोत. संस्थेचे दिव्यांग कार्य पाहून व उच्च शिक्षित सर्वगुणसंपन्न नेतृत्व पाहून आम्ही भारावून गेलो. आमचं नेहमीच सहकार्य हे एकलव्य दिव्यांग फाउंडेशनला असेल. आणि या संस्थेच्या माध्यमातून अत्ता पर्यंत वंचित राहिलेल्या दिव्यांग बांधवाना नक्कीच न्याय मिळेल. मी व माझे शेकडो दिव्यांग बंधू भगिनी या पुढे संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग कार्य हे अधिक जोमाने करू असे आपल्या भाषणात त्यांनी सांगितले. या वेळी एकलव्य दिव्यांग फाऊंडेशन ची भिवंडी कार्यकारणी घोषित करण्यात आली. या वेळी भिवंडी येथे अनेक पदाधिकारी राजेश तरे, प्रेम तरे, नरेश चौधरी, सुवर्णा म्हात्रे, आशा माळी, कालुराम दळवी, रणजित म्हात्रे, प्रियंका जाधव, हार्दिक पाटील, नमिता पाटील, बंडू बजागे, तुषार रंधवी, रसिका पाटील, सागर पाटील, संतोष वडोलकर, सविता भोईर
यश, किशोर वाघ, सुरेश चौधरी सह अनेक दिव्यांग पदाधिकारी व दिव्यांग प्रेमी उपस्थित होते.
यावेळी एकलव्य दिव्यांग फाउंडेशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री सुभाष गोळे सर शहापूर तालुका अध्यक्ष श्री कैलास बेलवले, शहापूर एकलव्य दिव्यांग फाउंडेशनचे खजिनदार श्री आशिष तारमळे सर, CA श्री मोहित ढाके सर यावेळी उपस्थित होते.