Satara news:आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आनंदाचा ठरला आहे
रिपोर्ट:विद्या मोर
सातारा/कराड:मुंबई येथील यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचा वर्ष २०२३ चा उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दलचा ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार -२०२३’ हा सन्मान आज सन्मानपुर्वक प्राप्त झाला.ठाणेचे माजी खासदार मा. डॉ. संजीव नाईक, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मा. मनोज शिवाजी सानप सर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब वाशी येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा आज उत्साहात पार पडला. कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनाही यावेळी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘यशवंतराव चव्हाण’ या नावातच विचार, प्रेरणा व प्रोत्साहन सामावलेले असल्याने या नावाचा सन्मान म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण आहे. सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण फाउंडेशन व निवड समितीचा मी मनापासून आभारी आहे.
गत चार वर्षांपासून हॉटेल व्यवसाय सांभाळताना, *हॉटेल सातारी गावरान ठसकाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रात सामाजिक जबाबदारीचे भान जपताना केलेल्या कामाची पोचपावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली, असे मला वाटते.निस्वार्थ सामाजिक कार्याची प्रेरणा मी नेहमी घेत आलो ते माजी राज्यपाल व सातारा नगरीचे विद्यमान लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब व युवानेते आदरणीय श्री. सारंग बाबा पाटील यांच्याकडूनच. उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करता आले, त्यामुळे नोकरी सोडून उद्योग व्यवसाय करण्याचे प्रोत्साहन दिले ते आदरणीय सौ. रचनाताई पाटील यांनी.आयुष्यात योग्य वेळी योग्य माणसे व मार्गदर्शन मिळाले की आपला मार्ग सोपा होतो. व्यवसाय सांभाळताना सामाजिकतेचे भान जपत कराड शहरातील गरीब मुलांना व ऊस तोड करणाऱ्या कामगारांना नवीन कपडे, स्वेटर, ब्लँकेट व जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्याचं काम हॉटेलच्या माध्यमातून करण्यात आले.
तसेच कोळे गाव येथील जिजाऊ अनाथ आश्रमला जीवनावश्यक वस्तूंचे किट मोफत दिले. युवानेते आदरणीय सारंग श्रीनिवास पाटील (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मलकापूर येथील पोस्ट ऑफिस, नगरपालिका, ग्रामदैवत लक्ष्मी देवी मंदिर, तलाठी ऑफिस, लाहोटी नगर मधील सत्यजित अपार्टमेंट, ईश्वरी अपार्टमेंट, गणेश रेसिडेन्सी, सुरज अपार्टमेंट तसेच ढेबेवाडी फाटा येथील पोलीस स्टेशन आदी ठिकाणी मोफत सॅनिटायजरची फवारणी व मोफत मास्क वाटप केले. तसेच कोरोना काळात कराड हॉस्पिटलमध्ये दिवस-रात्र जीवावर उदार होवून कर्तव्य भावनेतून रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर व स्टाफला ५०० हून अधिक मास्क व सॅनिटायझर बॉटल मोफत वाटप केले. तसेच महिला पोलीस भरतीच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कराड येथील शिवाजी स्टेडियम येथे सकाळी ७ च्या सुमारास मोफत नाष्टा देवून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व हसू शोधण्याचा प्रयत्न केला. अतिवृष्टी काळात संपर्क तुटलेल्या गावांमध्ये अत्यावश्यक अन्न व वस्तूंचे मोफत वाटप, तसेच आषाढी वारीत दरवर्षी वारकरी बांधवांना अन्नसेवा देण्याचा प्रयत्न केला, कोरोना काळात पाच ते सहा हजार गरजुंना केलेले मोफत अन्नदान. अर्थात याकामी सहकारी, कुटुंब व मित्रपरिवारांची नेहमीच अनमोल साथ राहिली. आजचा माझा हा सन्मान सर्वांना समर्पित करताना मनापासून आनंद होत आहे. या सन्मानाने प्रोत्साहन, प्रेरणा तर मिळालीच आहे, शिवाय जबाबदारीही अधिक वाढली आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने सुरू असलेले सामाजिक कार्य हे अविरतपणे चालूच राहील.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. संजय सावंत, समाजसेवक भरत पाटील, समाजसेविका मेघना काकडे-माने, पोलीस अधिकारी वर्षा काळे तसेच जया अलिमचंदाणी, पांडुरंग आमले, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.