समता सैनिक दला तर्फे भीमा कोरेगाव शौर्यदिना निमित्त डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना व कार्यकारणी घोषित
Samata Sainik Dal declared Dr. Babasaheb Ambedkar as human salute and executive on the occasion of Bhima Koregaon Shaurya Din.

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा –
१ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभुषण बागुल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर साजरी होत आहे .याच पाश्वभुमीवर जळगाव जिल्ह्यातील तालुका शाखा पाचोरा व भडगाव यांच्या वतीने मानवंदना आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. या वेळी समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे हे अभिवादन व मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते त्यांच्या हस्ते शिवणी ता.भडगाव येथील सेवापुर्ती करुण आलेले महार रेजिमेन्टचे हवलदार बागुल यांचा सत्कार व समता सैनिक दलात विशेष कामगिरी केलेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला. पाचोरा शहरातील महापुरुषाचे स्मारक छ.शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीबा फुले सावित्र माता फुले छ. संभाजी महाराज डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे जयघोष व माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सचिव अरुण खरे यांनी जिल्हाभर केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाचोरा व भडगांव तालुक्याची नुतन कार्यकारणीने विशेष परीश्रम घेतले.जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थिती समता सैनिक दलाची २०२५ ची पाचोरा व भडगाव तालुका नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.ज्ञानेश्वर सावळे पाचोरा तालुका अध्यक्ष,दशरथ तांबे ता.सचिव, विक्की ब्राह्मणे ता.उपाध्यक्ष,अजय जाधव ता.उपाध्यक्ष,चंद्रकांत सोनवणे ता.सहसचिव, अनिल राजेंद्रे ता. कार्याअध्यक्ष,अशपाक शेख ता.संघटक,अजय संसारे ता. संघटक,विशाल सोनवणे ता.संघटक प्रवीण सावळे, अरुण खरे जिल्हासचिव
भडगाव तालुका अध्यक्ष रामजी जावरे, दिलीप पवार तालुका सचिव, शांताराम गायकवाड ता. संघटक, रवींद्र शेजवळ लक्ष्मण शेजवळ,सुनील जावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सर्व नुतन पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पाचोरा शहर व तालुक्यातील समाज बांधव ,आंबेडकरी पुरोगामी विचारांच्या चळवळीतील काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार पाचोरा तालुका सचिव दशरथ तांबे यांनी मानले.


