समता सैनिक दल व जेष्ठ नागरिक संघटने तर्फे पत्रकारांचा सत्कार,व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार पदाधिकाऱ्यांना केले सन्मानित!
Journalists felicitated by Samata Sainik Dal and Senior Citizens Organization, Voice of Media journalist officers honored!
आबा सूर्यवंशी (जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा शहरात स्थापन झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या नवनियुक्त कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचा शासकीय विश्रामगृह येथे दि. ५ जाने. रविवार रोजी सकाळी साडअकराच्या दरम्यान समता सैनिक दल व जेष्ठ नागरिक संघटने तर्फे सत्कार समारंभ पार पडला. या प्रसंगी समता सैनिक दल चे किशोर डोंगरे व त्यांचे सहकारी कार्यकर्त्यांनी पत्रकार पदाधिकाऱ्यांचा पुष्प गुच्छ व पेन देवून सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी जेष्ठ पत्रकार व जिल्हा सल्लागार लक्ष्मण आबा सुर्यवंशी, विनायकराव दिवटे, दिलीप जैन,मिलिंद सोनवणे , तालुका सचिव रविशंकर पांडे, तालुकाध्यक्ष नंदकुमार शेलकर, तालुका कार्याध्यक्ष राहूल महाजन शहराध्यक्ष प्रविण बोरसे, उपाध्यक्ष प्रशांत येवले, दिलीप परदेशी, निखिल मोर , नरसिंग भुरे, चिंतामण पाटील, जावेद शेख, दिलीप चौधरी, आकाश सूर्यवंशी, एम एस. पाटील, जेष्ठ नागरिक संघटनेचे कैलास महाजन, समता सैनिक दलाचे पदाधिकारी आदीं उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर डोंगरे, मार्गदर्शन विनायक दिवटे तर आभार आबा सूर्यवंशी यांनी मानले.