किरण शेलार यांची कार्यकारी संचालक’ परीक्षेत उत्तर महाराष्ट्रातून निवड,सहकार क्षेत्रात साखर कामगाराच्या मुलाची उत्तुंग भरारी!

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
राज्य सरकारतर्फे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदासाठी घेण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पाचोरा येथील व सद्यस्थितीला संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथे कार्यरत असलेले किरण शेलार यांची कार्यकारी संचालक पदासाठी निवड झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातून या पदासाठी पन्नास ५० जण पात्र ठरले आहे.
राज्यभरातील सुमारे ३२५ अनुभवी अधिकारी या परीक्षेसाठी पात्र ठरलेले होते. वैकुंठभाई मेहता सहकारी प्रशिक्षण संस्थेमार्फत साखर आयुक्त यांचे मार्गदर्शनात चाळणी, लेखी आणि मौखिक परीक्षा घेण्यात आली. या मधून पन्नास गुणवत्ताप्राप्त उमेदवारची अंतिम यादी बनविण्यात आली. पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा असलेल्या या पॅनल मध्ये उत्तर महाराष्ट्रातून पाचोरा येथील किरण शेलार या एकमेव उमेदवाराचा समावेश आहे. किरण शेलार यांचे वडील माणिकराव शेलार हे एक सामान्य साखर कामगार होते. साखर कामगाराचा मुलगाच साखर उद्योगातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या कार्यकारी संचालक (एमडी ) परीक्षेत पात्र ठरले आहे. श्री.शेलार सध्या पैठण येथील सचिन घायाळ शुगर संचलित श्री संत एकनाथ साखर कारखान्यात कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यातील नामांकित कारखान्यात मुख्य रसायन तज्ज्ञ या पदावर सेवा बजावली आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी मिळविलेल्या
यशाबद्दल जळगांव जिल्ह्यात, पाचोरा -भडगांव मतदार संघात सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button