डी.एम.पाटील यांनी भाजपा सदस्य नोंदणीसाठी केले उल्लेखनीय कार्य !
प्रदेशाध्यक्ष श्री.बावनकुळे यांनी पत्राद्वारे केले कौतुक!
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, तुळजाई शिक्षणं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब डी. एम. पाटील पाटील यांनी भाजपा सदस्य नोंदणीचे केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र पाठवून त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या सदस्य नोंदणीच्या उपक्रमात भाजपा चे राज्य पदाधिकारी तालुक्याचे नेते , शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेले भाऊसाहेब डी . एम पाटील यांनी मतदार संघात भाजपा ची ताकद वाढविण्यासाठी सुरू असलेल्या सदस्य नोंदणीसाठी पाचोरा – भडगांव मतदार संघात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या पक्ष वाढीसाठी केलेल्या कामाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ,राज्याचे महसूल मंत्री ना.श्री. बावनकुळे यांनी श्री.पाटील यांच्या पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेतली असून त्यांना पक्षितासाठी केलेल्या कामाचे पत्राद्वारे कौतुक केले आहे.तसेच मतदार संघात देखील त्यांच्या पक्ष हिताच्या कामाचे अभिनंदन केले जात आहे.