Akola news:हिवरखेड ते चिचारी रोडची दुरवस्था,सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले चिचारी उमर शेवडी नया खेळा बोरवा भीली जोड रस्ता पूर्ण शिकस्त

प्रतिनिधी शोएब खान हिवरखेड अकोला

तेल्हारा तालुक्यातील चिचारी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले गाव मुस्लिम बहुसंख्य असून त्यांच्याकडे दुर्लक्ष तसेच सातपुड्याच्या आतील पुनर्वशीत केलेले आदिवासी बांधव सुद्धा रस्त्यासंबंधी नाराज.
हिवरखेड चिचारी जोड रस्ता आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य कोण करणार या रस्त्याचे संपूर्ण काम.
चीचारी गावचा विकास कोसो दूर स्थानिक प्रतिनिधी चिचारी व परिसरातील आदिवासी लोकांच्या समस्या सोडेल काय असे प्रश्न स्थानिक निर्माण करीत आहेत. हिवरखेड चीचारी या रोडने अनेक विद्यार्थी शेतकरी ये जा करतात मात्र लोकनेते काम करत नसल्याचा स्थानिक लोकांचा आरोप. चिचारी हिवरखेड रोड दुरुस्त होणार का याकडे प्रवासी सुद्धा वाहन चालक यांचे लक्ष लागले आहेत प्रवासी तसेच सामाजिक कार्यकर्ते चिचारी रोड बद्दल नाराजी व्यक्त करत आहेत लवकरच लोकप्रतिनिधीने या रोडची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन, किंवा उपोषण करणार आहोत. अशे मनोगत व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button