अकोला:फ्रीडम इंग्लिश स्कूलचे विज्ञान मॉडेल तालुक्यातून प्रथम/ फ्रीडम शाळेचे बालवैज्ञानिक जिल्हास्तरावर
महाराष्ट्र अकोट मोहम्मद जुनैद
अकोट
तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, पंचायत समिती शिक्षण विभाग व गणगणे विद्यालय यांच्या वतीने 19 डिसेंबर 2023 ला पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये फ्रीडम बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित गजानन नगर येथील फ्रीडम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक गटात सादर केलेल्या विज्ञान प्रतिकृतीची जिल्हास्तरीय प्रदर्शनीसाठी निवड झाली आहे. विज्ञान प्रदर्शनीत शाळेच्या विद्यार्थिनी चैताली दिनकर सोनोने, भक्ती निवृत्ती मंगळे, कु. राधिका संतोष भगत, आफरीम अनबीना मोहम्मद सलीम यांनी बायोमास ब्रिक्वेट ही प्रतिकृती सादर केली होती. जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल विजयी बालवैज्ञानिकांना पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वरजी रुद्रकार साहेब, बीआरसी ऑफिसच्या कु. तृप्तीताई बिजवे मॅडम, सेवानिवृत्त प्राचार्य प्रमिलाताई खलोकर मॅडम, नागे साहेब, प्राचार्य अनिल काकडे सर, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बालवैज्ञानिकांनी आपल्या यशाचे श्रेय शाळा समिती अध्यक्ष प्रवीण झाडे, फ्रीडम संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे, मुख्याध्यापिका अरुणा टाले, पर्यवेक्षक विजय रेवस्कर, निखिल अनोकार ,मार्गदर्शक विज्ञान शिक्षिका मयुरी आकोटकर, अनुराधा कतोरे विक्रांत सर यांना दिले आहे.