Akola:जागतिक जलदिनी फ्रीडम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतली जलप्रतिज्ञा

महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद अकोट

अकोट : स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीडम इंग्लिश स्कूल,आकोट येथे 22 मार्च 2024 ला “जागतिक जल दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम फ्रीडम इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका अरुणा ताले यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व सांगून, पाण्याचा सुयोग्य व विवेकी वापर, पाण्याचे संवर्धन व जतन, पाण्याविषयीचे कायदे,नियम, पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणं अशा सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली व पाण्याचा थेंब अन थेंब साठवणे आणि “कॅच द रेन”या अभियानाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण सहयोग देण्याचे आश्वासन देत विद्यार्थ्यांना देशाचा जलरक्षक म्हणून कार्यरत राहण्यासाठी प्रेरित केले. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी 22 मार्च या जागतिक जल दिनी जल प्रतिज्ञा केली. विद्यार्थ्यांनी “पाणी अडवा, पाणी जिरवा”, ” पाणी वाचवा जीवन वाचवा” अशा प्रकारच्या जलजागृती बद्दलच्या घोषणा दिल्या.तसेच देशाचा जलरक्षक म्हणून कार्यरत राहण्याची शपथ घेतली. असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button