कराडकरांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी डॉ.अतुल भोसले मैदानात

[responsivevoice_button rate="1" pitch="1.0" volume="0.9" voice="Hindi Female" buttontext="Listen This News"]

कृष्णा समूहाच्या सुमारे १५ टँकरद्वारे शहरात अहोरात्र पाणीपुरवठा सुरू आणि तसेच बसले. विद्या मोरे कराड
कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने, कराड शहरावासीयांना गेल्या ३ दिवसांपासून पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने कराडवासीयांची त्रेधातिरपीट उडाली आहे. विशेषतः महिला वर्गाला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत कराडकरांची तहान भागविण्यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले मैदानात उतरले आहेत. कृष्णा समूहाच्या माध्यमातून मंगळवार (ता. १६) पासून सुमारे १५ टँकरच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी अहोरात्र पाणीपुरवठा केला जात असल्याचे, शहरवासीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या ३ दिवसांपासून कराड शहरवासीयांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अतुल भोसले यांनी मंगळवारी पंपिंग स्टेशनला भेट देऊन, पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी जुन्या पंपिंग स्टेशनमधील काम तातडीने मार्गी लावून, शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
कराडवासीयांची पाण्याविना गैरसोय होऊ नये, यासाठी जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळित होत नाही, तोपर्यंत शहरवासीयांना पाण्याचा पुरवठा करण्याचे शिवधनुष्य डॉ. अतुल भोसले यांनी हाती घेतले आहे. यासाठी कृष्णा समूहाच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी सुमारे १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी भरुन हे पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे. गेल्या २ दिवसांत लाखो लिटर पाण्याचा पुरवठा या माध्यमातून करण्यात आल्याने, शहरवासीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

डॉ. भोसले यांनी आज शहरात ठिकठिकाणी क्णान व् समूहाच्या टँकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला. शहरात गरज भासेल त्याठिकाणी कृष्णा समूहाच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा करण्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी पाणी उकळून, गाळून प्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

Related Articles

Back to top button