जळगाव पोलीस दलाच्या वतीने जिल्हा शांतता कमेटी सदस्य आयु.किशोर डोंगरे यांचा सन्मान!!
सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी जबाबदारी पार पाडावी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
कार्यक्रमात किशोर डोंगरे सन्मानित
आबा सूर्यवंशी
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी) दि. १५ मार्च रोजी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी सण- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद,पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
शांतता राखण्याची जबाबदारी पोलिसांबरोबर समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्तींनीही स्वीकारली पाहिजे. समाजात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी शांतता समिती सदस्यांनी सतर्क राहावे असे जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी सांगितले. तसेच,समाजात अज्ञानता दूर करण्यावर भर दिला पाहिजे आणि महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान योग्य प्रकारे व्हायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सोशल मीडिया समाजात वाद आणि गैरसमज निर्माण करण्याचे प्रमुख साधन ठरत आहे. विशेषतः १५ ते २५ वयोगटातील युवक सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकत असल्याने वाद उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ पोहोचवावी,असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले.
जिल्हा शांतता समीतीच्या सदस्यानां विविध सूचना देण्यात आल्या – आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट पोलिसांना तत्काळ कळवाव्यात, शहरात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शहरारील मुख्य मिरवणूक मार्ग अतिक्रमण मुक्त करावेत.
बैठकीच्या शेवटी, जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पाचोरा येथील समाजिक कार्यकर्ता, समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष व जिल्हा शांतता कमेटी सदस्य आयु.किशोर डोंगरे यांना हेल्मेट देवून सन्मानित करण्यात आले. पाचोरा शहर हे शांतताप्रिय जातीय सलोखा,बंधूभाव राखणारे शहर आहे.शहरात किंवा तालुक्यात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचोरा पोलिस प्रशासनांच्या सहकार्याने चोख नियोजन आम्ही करणार आहोत तसेच सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाच्या मदतीने आव्हान देखिल करणार आहोत असे किशोर डोंगरे यांनी यावेळी सांगितले.या वेळी सामाजिक कार्यकर्ता आबा येवले हे देखील उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी मानले.