मा.मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त मंदिरात पठण
आबा सूर्यवंशी
(जळगाव जिल्हा प्रतिनीधी) –
शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये शिवसेना महिला आघाडी तर्फे दुर्गाशक्ती पाठाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थीत होते. तसेच पाचोरा शहर तथा तालुक्यातील प्रत्येक गावातील मंदिरात उपमुख्यमंत्री श्री .शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य लाभो यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर ,युवा सेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, जिल्हा परिषद सदस्य पदम पाटील तालुकाप्रमुख सुनील
पाटील शहरप्रमुख सुमित सावंत युवा शिवसेना शहरप्रमुख भोला पाटील, बंडू सोनार ,बापू हटकर ,भाजपाचे रवींद्र महाजन, वैभव पाटील, जितू पेंढारकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने युवासेना शिवसेना उपस्थित होते.