पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी तालुका दंडाधिकाऱ्याच्या पत्राला दाखविली केराची टोपली* शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला! आप्पा वाघ

आप्पा वाघ
( सोयगाव प्रतिनिधि)- सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकावर कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी दि.११ फेब्रुवारी रोजी दिलेल्या पत्रास पंकज बारवाल यांनी केराची टोपली दाखवीत व अधिकाराचा गैरवापर करीत चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर दि.१२ बुधवारी सोडून दिल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. सोयगाव पोलीस ठाण्याकडे वरिष्ठांचे का दुर्लक्ष करीत आहे हे मोठे कोडे बनले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की ,तालुक्यातील वडगाव तिगजी येथे दि.२२ जानेवारी रोजी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या सोयगाव पोलिसांनी दहा टायरी डंपर एम.एच.-१८बीजी-५२७७च्या चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने पकडून सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डंपर मध्ये वाळू (गौनखनिज) असल्याने तहसीलदार सोयगाव यांना आपल्या स्तरावरून कारवाई करणे संबंधी दि.०३ फेब्रुवारी रोजी पत्र देण्यात आले व याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना सुद्धा पत्राद्वारे माहिती देण्यात आली. दहा टायरी डंपर असल्याने त्यात सहा ब्रास वाळू होती. डंपर मालकास जास्त दंड होऊ नये म्हणून ठाण्यातच डंपर मधील एक ते दीड ब्रास वाळू उपसा करण्यात आली. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी डंपर चा काटा (वजन) न करता ओव्हर लोडचा दंड आकारता आला नाही. दरम्यान चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चा तपास अधिकारी असलेले सपोनि पंकज बारवाल यांनी तपास करीत असताना चालकाची व मालक यांची माहिती काढून तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना माहिती देणे बंधनकारक असतांना त्यांनी अधिकाराचा गैरवापर करीत तालुका दंडाधिकारी यांना माहिती दिली नाही. त्यामुळे सपोनि यांनी जाणीवपूर्वक वाळू माफियांशी संगनमत करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यास मदत केली. दरम्यान सोयगाव पोलीस ठाण्याकडूम दि.०३फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रावरून पोलीस ठाण्यातील डंपर च्या मागे खाली टाकण्यात आलेल्या वाळूला वगळून तलाठी यांनी दि.०७ फेब्रुवारी रोजी पाच ब्रास वाळूचा पंचनामा करून त्याचा अहवाल तहसिल कार्यालयात सादर केला.तलाठी यांच्या अहवालाचा संदर्भ देत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी दि.११ फेब्रुवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले त्यात नमूद करण्यात आले की, सदर वाहन मालकाचे नाव आपण सांगितले नसून चालकाचे नाव कळविले असून सदर व्यक्ती कोणत्या गावाची आहे याचा बोध होत नाही व सदर वाहन आपण कोणत्या तारखेस पकडले त्याचे सुद्धा आपण पत्रात उल्लेख केलेला नाही. सदर प्रकरणी जप्त वाहन मालकाचे नाव व गाव तसेच सदर वाहन कोणत्या तारखेस पकडले याबाबत ची माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावे जेणेकरून सदर वाहन मालकास 05 ब्रास चोरटी वाळू वाहतूक प्रकरणी दंडात्मक नोटीस सादर करणे सोयीचे होईल व शासकीय महसूल रक्कम चलन द्वारे शासन खाती जमा करणे योग्य होईल. दंड रक्कम वसूल होई पर्यंत सदर वाहन आपले अभिरक्षत ठेवावे असे पत्रात नमूद करण्यात आले असतांना देखील सपोनि पंकज बारवाल यांनी अधिकाराचा गैरवापर करून तालुका दंडाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवीत दि.१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर सोडून दिल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. याप्रकरणी मनमानी करणाऱ्या सपोनि पंकज बारवाल यांची ग्रामीण पोलीस अधीक्षक चौकशी करून काय कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तर महसूल विभागाकडून कारवाई संदर्भात काय भूमिका घेतली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button