Mumbai news:धारावीकरांच्या न्यायासाठी मुंबई च्या रक्षणासाठी अदानी विरुद्ध उध्दव ठाकरे गटाचा धारावीत धडक मोर्चा!

रिपोर्ट/अजय उपाध्याय
मुंबई:अदानी समूहाविरोधात आज दिनांक १६ डिसेंबर२०२३ रोजी दिन शनिवार दुपारी ३ वाजता उद्धव ठाकरे गटाचा धारावीत टी जक्शन येथील धडक मोर्चा काढण्यात येणार आहे।
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे.त्यासाठी ठाकरे गटाकडून तयारी देखील करण्यात आली आहे.स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चेत सहभागी असणार आहेत.ठाकरे गटाकडून कुर्ला कालिना विधानसभा विभाग क्र-६चे विभागप्रमुख डॉ.महेश पेडणेकर यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.अदानी विरुद्ध विराट मोर्चा, धारावीकरांच्या न्यायासाठी मुंबईकरांच्या रक्षणासाठी, अशा प्रकारच्या मजकुराचे बॅनर ठाकरेगटाचे विभागप्रमुख डॉ .महेश पेडणेकर कडून कुर्ल्यात ठिकठिकाणी लावण्यात आले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.अदानी समूहाविरोधात आज शनिवार दुपारी ३ वाजता टी जक्शन धारावी येथील ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे.ठाकरे गटाचे कुर्ला कालिना विधानसभा विभाग क्र.६ चे विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर यांनी या मोर्चाची माहिती दिली आहे. टी जंक्शन ते अदानी समूहालाच्या कार्यालयापर्यंत आमचा भव्य मोर्चा आज निघणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि धारावी म्हणजे केवळ झोपडपट्टी नाही तर सामान्य माणसानी उभं केलेले उद्योग आणि रोजगारांच प्रमुख केंद्र देखील आहे एक उद्योगपती हे सगळं टिकवून ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल का…??नाही ना!!म्हणूनच उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकर म्हणून सामील व्हा !!
अशा आव्हान विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर आणि उपशाप्रमुख असलम कुरेशी यांनी जाहीर आव्हान केलं आहे।





