जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी खरा इतिहास दाखवण्याची गरज:आ.किशोरआप्पा पाटील

There is a need to show true history to maintain caste harmony. Kishoreappa Patil

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – आपल्या देशात व राज्यात जातीय सलोखा व शांतता कायम ठेवण्यासाठी योग्य व खरा इतिहास दाखवण्याची गरज आहे. आजचे युगात खोटे इतिहास दाखवून समाजा समाज मध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, म . ज्योतिबा फूले सारखे महापुरुषांनी जात-पात न पाहता मानवतेची सेवा करून इतिहास घडवलेला आहे. त्या महापुरुषांचे खरे इतिहास दाखवून जातीय सलोखा, शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. ईद मिलन व शिरखुर्मा सारख्या कार्यक्रम एकमेकांना जवळ करून एकमेकांचे सुख मध्ये सहभागी होणे व एकमेकांना समजण्याचा अवसर प्राप्त करतो. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षेत्र, मोहल्ला, गाव शांततापूर्ण ठेवण्याचे प्रयत्न करावे असे आव्हान त्यांनी केले. पाचोरा उर्दू टीचर्स असोसिएशन व शिक्षक सेना पाचोरा यांचे संयुक्त विद्यमानाने शुक्रवार रोजी मौलाना आझाद हॉल जि.प.उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या ईद मिलन व शिरखुर्मा कार्यक्रम मध्ये तो बोलत होते.आसिफ जलील यांनी पवित्र कुरान पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थिनी अलीना शेख यांनी नाते पाक प्रस्तुत केली. कार्यक्रमाची प्रस्तावना विजय ठाकूर यांनी मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार माननीय किशोर आप्पा पाटील हे होते. केंद्रप्रमुख शेख कदीर शब्बीर व विजय ठाकूर यांनी आपल्या भाषणात आपल्या क्षेत्रात शांतता कायम ठेवण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याची गरज वर भर दिला. सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले. कार्यक्रम मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष संजय गोईल, राजेंद्र पाटील, दिलीप महाजन, अनिल वराडे, शकूर बागवान, रफिक बागवान, जितू जैन, परविन ब्राह्मणे, लतीफ मेंबर, तालीब कुतुबुद्दीन, सईद शेख, रेहान खान, तारीक सय्यद, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वीत्यासाठी सलमान शौकत, जावेद रहीम, खिजरोद्दीन शेख,मोईन सय्यद,असलम खाटीक, नासिर खान यांनी परिश्रम घेतले. जावेद रहीम यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button