पाचोरा पीपल बँक सहकार पॅनल प्रचाराचे श्रीफळ वाढवून शुभारंभ,ॲड अतुल संघवी यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलला सर्व स्तरावर पाठिंबा!
Pachora People Bank Cooperative Panel campaign begins with increasing results, support at all levels for the Cooperative Panel led by Adv. Atul Sanghvi!
पाचोरा प्रतिनिधी:आबा सूर्यवंशी:
नगरपालिका जीन मधील प्राचीन देवी मंदिर येथे प्रचाराचा नारळ नारळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले पाचोरा येथील पीपल्स बँकेची निवडणूक सुरू असून चेअरमन अतुल संघवी यांच्या सह.. अन्य आठ उमेदवार बिनविरोध झाले होते. दिनांक ३० जुन रोजी माघार प्रक्रिया पार पडली . पीपल्स बँकेच्या निवडणूक ही बिनविरोधच्या वाटेवर असताना एक उमेदवाराने माघार घेतली नसल्याने नऊ जागेसाठी निवडणूक होणार आहे. १३ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
बँकेच्या निवडणुक पार्श्वभूमीवर आज दि.२ जुलै बुधवार रोजी विद्यमान चेअरमन ॲड अतुल संघवी यांनी शहरातील बँकेचे भागधारक, सदस्य आणि राजकीय समर्थक यांच्या उपस्थितीत शहरातील मध्यवर्ती भागातील जागरूक, प्रसिद्ध देवी मंदिरात प्रचाराचे श्रीफळ वाढवून सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ केला . या प्रसंगी ॲड. अतुल संघवी यांच्या नेतृत्वात निवडणूक आखाड्यात असलेल्या सहकार पॅनेलचे समर्थक आ. किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे सुपुत्र युवा नेते सुमित वाघ, भाजपात नुकतेच प्रवेश करणारे वाघ गटाकडून पीटीसी चेअरमन संजय वाघ, पीटीसी व्हा.चेअरमन व्ही.टी.नाना जोशी, डॉ.जयवंतराव पाटील, पीपल्स बँक व्हा. चेअरमन प्रशांत अग्रवाल, सुभाष अग्रवाल, शेतकी संघ व्हा.चेअरमन नंदू पाटील, भाजपा माजी शहराध्यक्ष दत्ता बोरसे पाटील, माजी उप नगराध्यक्ष शरद पाटे, व्यावसायिक प्रतिष्ठानचे जेष्ठ व्यापारी नारायण पटवारी, दुष्यंत रावल, राजू बोथरा , पुरुषोत्तम अग्रवाल, माजी नगराध्यक्ष विष्णू सोनार, नंदू सोनार, गोविंद मोर, बरकत संघवी, राजेंद्र भोसले, सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले,बँकेचे सर्व आजी माजी संचालक, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, न्याय विधी क्षेत्रातील वकील, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स , आदींची उपस्थिती होती. सहकार पॅनलच्या निवडणूक कालावधीत वेग, वेगळ्या गटातून बँकेच्या हितासाठी उमेदवारी करणाऱ्यांनी माघार घेतल्याने चेअरमन अतुल संघवी, व्हा.चेअरमन प्रशांत अग्रवाल सह सात उमेदवार बिनविरोध निवडून आले असून बँकेच्या सत्तेवर ॲड. अतुल संघवी यांचे वर्चस्व राहणार असल्याचा दावा केला जात आहे. मतदारांनी सहकार पॅनेलचे उर्वरित सर्व जागांवर उमेदवार निवडून देण्याचे आवाहन प्रचारात आवाहन करण्यात येत आहे.