जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्त इनरव्हील क्लब कराड संगमचा मदतीचा हात

जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम च्या वतीने दिव्यांगांसाठी उपयुक्त साहित्याचे वाटप केले.डॉ.द.शी.एरम मूकबधिर विद्यालयाच्या वस्तीगृहातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी 45 बेडशीट क्लबच्या वतीने भेट देण्यात आली.
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम दिव्यांग सप्ताह निमित्त दरवर्षी दिव्यांग मुलांसाठी विविध उपक्रम राबवित असतो.क्लब च्या वतीने दरवर्षी दिव्यांगांना आवश्यक साहित्य भेट, दिव्यांग सप्ताह जनजागृती रॅली, तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी इत्यादी उपक्रम राबवीत असतो. या कार्यक्रमांमध्ये क्लबच्या प्रेसिडेंट तरुणा मोहिरे यांनी क्लब च्यावतीने राबवण्यात येणाऱया उपक्रमाची माहिती दिली.क्लब सेक्रेटरी छाया पवार यांनी यापुढे सुद्धा क्लबच्या वतीने विद्यालयाला मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.जयश्री गुरव यांनी क्लबच्या वतीने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले व क्लबच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. कराडमध्ये इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम ने आपल्या चांगल्या कामातून समाजामध्ये आपला चांगला ठसा उमटवला आहे. असे गौरवउद्गार काढले.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हनमसागर मॅडम यानी सर्वांचे स्वागत केले. निरंजन साळुंखे सरांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, क्लब सदस्य सारिका शहा , विद्या पावसकर,पुष्पा चौधरी, माहेश्वरी जाधव,सुषमा तिवारी,दीपाली लोहार,वृषाली पाटणकर ,अपूर्वा पाटणकर, स्नेहांकि आवळकर,सुकेशीनी कांबळे, शिल्पा पवार,
कोमल शिंदे इ.उपस्थित होत्या महाराष्ट्र कराड होऊन पियुष गोर छोटीशी रिपोर्ट



