मुंडगाव येथे महसूल दिनानिमित्त कार्यक्रम

अकोट महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद

अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील श्री गजानन महाराज पादुका संस्थान येथे महसूल पंधरवडा दिनानिमित्त शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यासाठी शनिवार ३ ऑगस्ट रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन महाराज पादुका संस्थानचे अध्यक्ष विलास बहादुरे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर तसेच तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण, बार्टी प्रकल्प अधिकारी तथा सामाजिक न्याय विभाग अकोला नोडल अधिकारी विजय बेदरकर ,मुलांचे वस्तीगृह अकोट अधीक्षक यांचे अधीक्षक विनोद गायबोले, मंडळ अधिकारी मनोहर अढाऊ, वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा भिरडे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभाते,तंटामुक्ती अध्यक्ष राजेश वारकरी,बाळकृष्ण भगेवार आदी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती दिली.यावेळी विजय बेदरकर पार्टी प्रकल्प अधिकारी यांनी शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. तसेच उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर,तहसीलदार डॉक्टर सुनील चव्हाण यांनी जनतेला योजनांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांची बहुसंख्य उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तलाठी राजेंद्र वानखडे, तलाठी रितेश केळकर,तलाठी प्रज्ञा गावंडे,तलाठी राहुल बंकेवार आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन व आभार राहुल भेले यांनी तर प्रस्ताविक तलाठी राजेंद्र वानखडे यांनी केले.

Related Articles

Back to top button