भडगाव शहरात श्री रोहिणेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा…

रिपोर्ट:देविदास सोनवणे भडगाव महाराष्ट्र

भडगाव शहरातील उज्ज्वल कॉलनी येथे स्व. रायभान सदा पाटील (भोसले) यांच्या स्मरणार्थ विजयकुमार रायभान भोसले व सौ. माया विजयकुमार भोसले यांच्या स्व खर्चाने महादेवाचे संपूर्ण मंदिर उभारण्यात आले आहे.सदरहू मंदिर जीर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठा दिनांक :- २७,२८,२९ रोजी तीन दिवसांची महापूजा,होम हवन व इतर सर्व विधी स्वतः विजयकुमार भोसले,रवींद्रजी लांडे,अशोक तायडे,रोहित साळुंखे,गोपाल कोळी,चुडामन पाटील सर,राजेंद्र पाटील,मनीष महाजन,सर्जेराव भोसले,आदर्श पाटील,अक्षय चांदगुडे हे सर्व सपत्नीक 11 जोडप्यांनी केला.
पहिल्या दिवशी 27 तारखेला नगर प्रदिक्षणा मुर्त्यांची अप्रतिम मिरवणूक काढून वास्तूपूजन, शांतीसुक्त,प्रधान देवता,नवग्रह पूजन करून मूर्तीस धाण्याधिवास हवन तर २८ तारखेला स्थापित देवता पूजन, कलश स्थपन विधी,ध्वजारोहण हवन व मूर्तीला जलाधीवास व शय्याधीवास हवन,२९ तारखेला कळस पूजन,घंटा पूजन,मूर्ती प्राणप्रतिष्ठा, उत्तरांग हवन,पूर्णाहुती असे विविध पूजा विधी व होम हवन करण्यात येवून.शेवटी महाआरती व प्रसाद देण्यात आला.महाआरतीस तर परिसरातील असंख्य कुटुंब व शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.विशेष म्हणजे महाआरतीस शेकडो महिलांनी स्वतःचे आरतीचे ताट तयार करून आरती मध्ये सहभाग घेतला.तसेच महप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेवून समाधान व्यक्त केले.मंदिराचे कलसपुजन अयोध्या येथील पाचोरा राम मंदिर येथे राहत असलेले ब्रह्मचारी विष्णुदासजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले व महाआरतीचा मान परिसरातील शेकडो भाविकांसह भडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्रजी लांडे साहेब यांना सहपत्नीक देण्यात आला.सदरहू जीर्णोद्धार व प्रतिष्ठान पूजा विधि ,गुरुजी बाळकृष्ण टोणगावकर यांच्या सह ,सोमनाथ देशपांडे,भूषण सकळकर,अमोल टोणगाकर ,वासुदेव मांडे,शशिकांत झोडगेकर,शुभम टोणगाकर असे सात गुरुजींच्या हस्ते संपन्न झाला. अतिशय सुंदर मूर्ती व अप्रतिम मंदिर उभारून तीन दिवसांचा संपूर्ण होम हवन,पूजा विधी केल्याने गावातील व परिसरातील नागरिक विजयकुमार भोसले यांचे कौतुक करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button